Mahayuti Politics : रत्नागिरीत शिंदेंची शिवसेना वरचढ; महायुतीत भाजप नाराज, वेगळ्या भूमिकेचा इशारा

Activists are upset that the Mahayuti BJP did not get a single assembly constituency in Ratnagiri district : महायुतीत जागा वाटपात रत्नागिरी जिल्ह्यात वाट्याला एकही मतदारसंघ न आल्याने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराजी वाढली आहे.
Ratnagiri bjp
Ratnagiri bjpSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच उमेदवारी अर्ज भरेपर्यंत कायम राहिला. राज्यातील काही जागांवर महायुतीमधील उमेदवार आमने-सामने असतील, असे चित्र आहे.

यातून महायुतीमधील विसंगतपणावर महाविकास आघाडीकडून टीका होते. महायुतीमधील असाच विसंगतपणा रत्नागिरी जिल्ह्यात समोर आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघापैकी एकही जागा भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळाली नसल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने शेवटच्या टप्प्यात गुहागर मतदारसंघाची जागेवर उमेदवार देत, भाजपच्या शेवटच्या आशेवर पाणी फिरवलं.

Ratnagiri bjp
Shaina NC VIDEO: मला 'माल' बोलता..."तुम्ही बेहाल होणार .." शायना एनसी यांचा अरविंद सावंतांवर हल्लाबोल

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, दापोली आणि राजापूर असे पाच मतदारसंघ आहेत. या पाच पैकी चार मतदार संघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) उमेदवार दिले आहेत. यात राजापूर, रत्नागिरी आणि दापोलीमधील मतदार संघातील उमेदवार पहिल्याच यादीत जाहीर केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिपळूण मतदारसंघ दिला.

Ratnagiri bjp
NCP Sharad Pawar: पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा; लोकसभेला फटका बसलेल्या 'पिपाणी' चिन्हाबाबत आयोगाचे नवे महत्त्वाचे 'हे' आदेश

महायुतीत गुहागर मतदार संघावरून भाजप आणि शिवसेनेत पेच निर्माण झाला होता. हा मतदारसंघ भाजपला सुटेल, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. तशी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग देखील लावली होती. यासाठी महायुतीत वाटाघाटी देखील झाल्या. परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उमेदवार जाहीर करून टाकला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर केल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत. गुहागर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. यावर शिवसेनेने अतिक्रमण केल्याची भावना भाजप कार्यकर्ते आता बोलवून दाखवू लागले आहे. भाजपच्या नाराजीचा फटका इथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला बसणार, अशी उघड चर्चा आता भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com