Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी हा निर्णय दिल्लीतून झाला आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना'UBT' पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. तसंच महाविकास आघाडीतील जागा वाटपावर थोडीच चर्चा शिल्लक राहिली आहे आणि आता उमेदवारांच्या प्रचारावर आणि नाराजांशी चर्चा करणार असल्याचे संकेत दिले.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मुंबईतील माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. ठाकरे परिवारातील दुसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाने या मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवार दिली आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार सदा सरवणकर देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.
अमित ठाकरे यांच्या निवडणुकीचा मार्ग सुकर होण्यासाठी महायुतीत हालचाली सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, अशा चर्चा सुरू आहे. परंतु आमदार सरवणकर निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम असून, गेल्या 2019 च्या निवडणुकीत ते 61 हजार पेक्षा जास्त मतं घेऊन विजयी झाले होते.
अमित ठाकरे यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्यासाठी महायुतीमधील हालचालीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'यांचे सर्व निर्णय दिल्लीत होतात. अमित ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं', हा देखील निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, "माहीममध्ये शिवसेनेचा आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा आहे म्हणून ते मिरवत आहेत. पण ते स्वतः निर्णय घेऊन शकत नाही. त्यांच्या पक्षाचे निर्णय दिल्लीतून ठरतात. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने कुठे लढावं आणि कुठे नाही लढावं, हे देखील निर्णय दिल्लीतून घेतले जात आहेत". जो पक्ष अमित शाह यांचा गुलाम आहे त्या पक्षांना स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.