Bandra Terminus stampede : "रील मंत्री, 'रेल्वे मंत्री' झाले असते तर ..."; वांद्रे स्टेशनवरील चेंगराचेंगरीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

Bandra Terminus stampede Latest News Update : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aditya Thackeray, Railway Minister Ashwini Vaishnav
Aditya Thackeray, Railway Minister Ashwini VaishnavSarkarnama
Published on
Updated on

Bandra Terminus News, 27 Oct : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील (Bandra Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून या घटनेची तीव्रता लक्षात येत आहे. दरम्यान, याच घटनेवरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) ट्वीट करत रेल्वे मंत्र्यांवर टीका केली. त्यांनी लिहिलं की, "रील मंत्री एकदा रेल्वे मंत्री झाले असते तर... सध्याचे रेल्वे मंत्री किती अक्षम आहेत, हे वांद्रे घटनेवरून दिसून येते. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अश्विनी वैष्णवजी यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे.

परंतु दर आठवड्याला रेल्वेत काही ना काही अपघात घडत असतात. आपल्या देशाला अशा अक्षम मंत्री लाभला ही किती लाजिरवाणी बाब आहे." अशा शब्दात त्यांनी रेल्वे मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे ते गोरखपूर एक्सप्रेसने (By Bandra to Gorakhpur Express) प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, वांद्रे ते गोरखपूर या गाडीला यायला उशीर झाला. त्यामुळे उशीरा आलेल्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. यात काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले आणि त्यामध्ये ते जखमी झाले. यानंतर जखमींना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Aditya Thackeray, Railway Minister Ashwini Vaishnav
Parvati Assembly Election : 'मविआ'त बंडखोरी अटळ, काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी 'पर्वती पॅटर्न'ची चर्चा

'हायफाय' रेल्वे मंत्र्यांनी काय केलं?

दरम्यान, या घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील रेल्वे मंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ते म्हणाले, "आमचे मुंबईचे लोक चेंगरून मरत आहेत. या नवीन रेल्वे मंत्र्यांनी काय केलं? 17 मोठे आणि इतर अपघात झाले आहेत. हायफाय, आयआयटी वाले अशी ज्यांची ख्याती आहे त्यांनी काय केलं रेल्वेसाठी सांगावं?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com