Kedar Dighe : केदार दिघेंचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला फोन, सुरवातीला आरोप नंतर संतापले...

Kedar Dighe was angry with the Election Commission for not taking action on code of conduct violations in Kopri Pachpakhadi Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेचा वारंवार भंग होताना असताना निवडणूक आयोगाकडून कारवाई होत नसल्याने केदार दिघे चांगलेच संतापले.
Kedar Dighe
Kedar DigheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील हाय व्होल्टेज लढतीपैंकी एक म्हणजे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील.

धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार तथा आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यात इथं लढत होत आहे. या मतदारसंघातील ही हाय व्होल्टेज निवडणूक आयोगाला झेपत नसल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदार केदार दिघे यांच्या संतापल्यावरून दिसतं आहे.

ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून आचारसंहितेचा वारंवार भंग होताना दिसतो आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वारंवार तक्रारी होऊन देखील निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही. या प्रकारावर शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे चांगलेच संतापले आहेत.

Kedar Dighe
Worli Constituency Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने 500 रुपये देऊन प्रचारासाठी लोकं आणली; 'शिवसेनाUBT'च्या तक्रारीची गंभीर दखल

केदार दिघे यांनी याबाबत निवडणूक (Election) आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना फोन लावून जाब विचारला. सुरवातीला संयमाने घेतले, पण नंतर केदार दिघे संतापले. 'झेपत नसेल, तर लिहून द्या. पुढं काय करायचे ते मी करतो', असा इशारा केदार दिघे यांनी दिला. केदार दिघे यांनी निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्याशी बोलतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे.

Kedar Dighe
Raj Thackeray Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर महिलेचा भोजपुरी गाण्यावर डान्स, राज ठाकरे बरसले

शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी समोरच्या अधिकाऱ्याशी संवाद साधताना "कायदे फक्त आमच्यासाठी आहेत का? आम्ही सांगितल्यावर आणि दाखवल्यावर कारवाई करता, हा कोणता कारभार आहे. लाज वाटली पाहिजे. अधिकारी असून तुम्हाला उमेदवार सांगतो आहे. नसेल होणार, तर लिहून द्या. झेपणार नाही म्हणून. लिहून देता का?", अशी प्रश्नार्थी विचारणा केली.

"हे सगळं कधी केले पाहिजे? असा प्रश्न केदार दिघेंनी निवडणूक आयोगाला केला. आचारसंहितेचा कायदा फक्त आम्हाला, बाकीचा कोणाला नाही का? तुम्ही एवढे हेल्पसेल आहात का? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना काही नियम आहेत का नाही? उमेदवारांनी दाखवल्यावरच नियमांची आठवण होते का? दहा ठिकाणी दाखवल्यात आचारसंहिता भंगाचे प्रकार, मॅनेज नाही ना, कालची गाडी दाखवली तशी?", असा टोला देखील केदार दिघेंनी निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलताना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com