Supreme Court MLA Disqualification: सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार ?

Maharashtra Politics : अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या, अशीही मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.
Supreme Court Final Decision  News update
Supreme Court Final Decision News updateSarkarnama

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयावर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज (ता.१४) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही सुनावणी लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालय काय आदेश देणार हे लवकरच समजेल.

Supreme Court Final Decision  News update
Eknath Shinde : महाकलंक तर तुम्ही आहात ; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही.

या याचिकेवर लवकर निर्णय घेण्याची मागणी सुनील प्रभु यांनी केली होती. यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या, अशीही मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

Supreme Court Final Decision  News update
NCP Split : "अजून काय पाहिजे" नंतर आता रोहित पवार म्हणतात, "मुद्यांच बोला..'; जुन्या सहकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे. या नोटीसीचे उत्तर त्यांना येत्या सात दिवसात द्यावे लागणार आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना सुद्धा 11 ऑगस्टच्या आधी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com