Amruta Fadnavis News :अमृता फडणवीसांच्या आडून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न? पोलीस तपासात माहिती उघड

अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
Amruta Fadnavis News :
Amruta Fadnavis News :Sarkarnama
Published on
Updated on

Amruta Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना दहा कोटींची लाच देण्याप्रकरणी फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिघांनी हिला न्यायालयाने २१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. धक्कादायक म्हणजे संपूर्ण कट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी आखण्यात आला असावा,असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्यासाठी अनिक्षाने त्यांचे काही बनावट व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप बनवलेल्या होत्या.

Amruta Fadnavis News :
Amruta Pawar News; छगन भुजबळ यांच्या त्रासामुळेच राष्ट्रवादी सोडला!

अनिक्षाने त्या सगळ्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांना पाठवल्या आणि त्या डिलीट करण्यासाठी तिने त्यांच्याकडे दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच, त्यांनी खंडणी न दिल्यास संबंधित क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी अमृता फडणवीसांनी तिने दिली होती, असा खुलासा पोलिसांनी न्यायालयात केला.

अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांच्या विरोधात दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी ती सगळे प्रयत्न करत होती. पण यामागे राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेपही असू शकतो, असा दावा करत पोलिसांनी पुढील तपासासाठी पोलिसांनी अनिक्षाला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. पण कोर्टाने तिला 21 मार्चपर्यंतच पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणात येत्या काळात काय-काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com