Aurangabad News : 'धाराशीव'बाबत अडचण नाही, मात्र औरंगाबादचं नामांतर केंद्राने ठेवले वेटिंगवर!

Aurangabad : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याबाबत अजूनही केंद्राकडून विचाराधीनच!
Aurangabad News
Aurangabad NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad News : मागील अनेक दिवसांपासून उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्हा नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहे. आज अखेर केंद्र सरकारने या निर्णयाबाबत मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. उस्मानाबादचं नामांतर करून 'धाराशिव' करण्याला काही हरकत नसल्याचे, केंद्र सरकारने कळविले आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची प्रक्रीया अजूनही विचाराधीन आहे, असे सरकारने म्हंटले आहे.

Aurangabad News
Bachchu Kadu News: बच्चू कडू संतापले, अन् आता एकटेच जाऊन उधळणार बॅंकेची लिलाव प्रक्रिया !

औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर अजूनही प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करण्याचा राज सरकारने निर्णय घेतला होता. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयालाच आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान करण्यात आले आहे. याच याचिकेच्या सुनवाईदरम्यान केंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Aurangabad News
Satyajeet Tambe : नगर जिल्ह्यात नवीन राजकीय समिकरणांची नांदी? सत्यजीत तांबे-विखे पाटीलांची भेट

या दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर करण्याचा निर्णय आधी महाविकास आघाडीतील ठाकरे सरकारने घेतला होता. यानंतर राज्यात ठाकरे सरकार जाऊन, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर हा निर्णय घेऊन पुन्हा हा निर्णय घेतला. हा प्रस्ताव केंद्रसरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com