Uddhav Thackeray: काहींच्या पोटात दुखत होते, तरीही मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला !

शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे अयोध्येतून बाबरचे नाव पुसले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून औरंगाबादचे नाव पुसले.
Uddhav Thackeray News, Bhagat singh koshyari News, Maharashtra Political Crisis
Uddhav Thackeray News, Bhagat singh koshyari News, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेले राजकीय (maharashtra political crisis) डावपेच आता संपुष्टात आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी काल (बुधवारी) राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी तीन महत्वाचे निर्णय घेतले, या निर्णयाबाबत 'सामना'तून भाष्य केले आहे. (maharashtra political crisis)

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची घोषणा काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे अयोध्येतून बाबरचे नाव पुसले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून औरंगाबादचे नाव पुसले, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. (Uddhav Thackeray News in Marathi)

मंत्रिमंडळात जनभावनेशी संबंधित निर्णय घेण्यात आले. लोकनेता दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळासाठी निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे आश्वासन पूर्ण केले. औरंगाबादचे नाव बदलल्याने काहींच्या पोटात दुखत होते. तरीही त्याची पर्वा न करता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.

निकाल मुस्लिमांनी स्वीकारावा

‘अयोध्या’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय देशभरातील मुस्लिम समाजाने स्वीकारला, तीच भूमिका संभाजीनगरच्या प्रकरणात स्वीकारली जावी. ‘ठाकरे’ सरकार औरंगाबादचे संभाजीनगरमध्ये रूपांतर करण्यास घाबरत आहे, असा सवाल राज्याच्या विरोधकांनी मध्यंतरीच्या काळात उपस्थित केला होता. खरे तर फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजवटीत असे का केले नाही, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आधी द्यावे, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Uddhav Thackeray News, Bhagat singh koshyari News, Maharashtra Political Crisis
शिवसेनेत 'रिस्क' घेतलेल्यांना फडणवीस देणार मोठे 'बक्षिस' ; मंत्रीपदे कुणाला ?

दोन्ही शहरांची नावे बदलणे म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना आदरांजली ठरेल. हा निर्णय दोन्ही पक्षांनी नम्रपणे स्वीकारावा. तरच हिंदुत्वाचा आदर होईल आणि देशभक्तीची भावना दृढ होईल. या मुद्द्यावर लोकांना भडकवण्याचे काम केले जाईल. मात्र हा निर्णय बाळासाहेबांच्या इच्छेनुसार आहे, असे शिवसेनेने म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'मध्ये..

  • महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचे नाव औरंगजेबाच्या नावावर ठेवणे वेदनादायी होते, तसेच स्वाभिमान दुखावणारे होते.

  • काही लोकांनी औरंगजेबाच्या कबरीला नमाज पठण करण्यासाठी मुद्दाम भेट दिल्यानंतर हा अवशेष प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. महाराष्ट्र फक्त शिवरायांचे विचार आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका स्वीकारणार आहे.

  • या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला वेग आला असून ठाकरे सरकार चर्चेत आले आहे. आता विरोधकांना काय म्हणायचे उरले आहे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com