Maharashtra Politics : आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच..; अजितदादांवरील आरोप खोटे की खरे ?

Ajit Pawar News : न्यायालयाने त्यांना जामिनावर बाहेर ठेवले व इतरांच्या फाईलींना ‘चाप’ लावला.
Sanjay Raut  Ajit Pawar
Sanjay Raut Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अजित पवार हे आपल्या आठ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवारांच्या प्रवेशाला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून अजित पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य करण्यात आले आहे.

भ्रष्टाचार करा व भाजपात सामील व्हा..

अजित पवार (Ajit Pawar) हे सध्याच्या राजकारणातील ‘संत’ आहेत. तर भुजबळ, हसन मुश्रीफ, वळसे पाटील हे ‘महात्मे’ बनले आहेत. याविषयी सामान्य जनांच्या मनात आता कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची हमी पंतप्रधान मोदी यांनी दिली व त्या हमीनुसार मुश्रीफ वगैरे महात्मे तुरुंगातच जाणार होते, पण आता न्यायालयाने त्यांना जामिनावर बाहेर ठेवले व इतरांच्या फाईलींना ‘चाप’ लावला. भ्रष्टाचार करा व भाजपात सामील व्हा, कायदा तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही, अशा अशा शब्दांत "सामना'मधून भाजपवर कागदी बाण सोडण्यात आले आहे.

Sanjay Raut  Ajit Pawar
Cabinet expansion : शिंदे-फडणवीसांमध्ये मध्यरात्री 'वर्षा' वर दोन तास खलबतं ; मंत्रीमंडळ विस्ताराबाबत..

काय कारवाई करणार ?

"आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच आहे. अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे? व खोटे असतील तर ‘ईडी’च्या बेताल वर्तणुकीवर काय कारवाई करणार? एकंदरीत सगळाच घोटाळा आहे," असे अग्रलेखात नमूद केलं आहे.

Sanjay Raut  Ajit Pawar
NCP News : जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा खून

कोट्यवधीची प्रकरणे दाबून अशांना मंत्रीपदे..

कोविड सेंटरवरुन शिंदे गट, भाजपकडून ठाकरे गटावर आरोप करण्यात येत आहेत. यावर अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. "कोविड सेंटर प्रकरणात साप समजून भुई धोपटण्याचे प्रकार सुरू आहेत. ज्यांनी कोरोना काळात लोकांचे प्राण वाचवले, भुकेल्यांना खाऊ-पिऊ घातले, घरे जिवंत ठेवली ते अधिकारी, संस्था, कार्यकर्ते यांच्या मागे भाजपपुरस्कृत ‘ईडी’ लागली आहे. पण दुसऱ्या बाजूला ‘मनी लाँडरिंग’ची कोट्यवधीची प्रकरणे दाबून अशांना मंत्रीपदे देण्याची अतिभ्रष्ट प्रकरणे घडत आहेत. यावर आता आम्ही बोलण्याऐवजी भाजपमधील भ्रष्टाचारविरोधी लढ्याच्या शिलेदारांनी बोलायला हवे," असे आवाहन ठाकरे गटानं केलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com