Eknath Shinde Dasara Melava 2023: 'गर्व से कहो हम काँग्रेसी है' म्हणण्याची वेळ ठाकरेंवर आली; एकनाथ शिंदेंचा टोला

Shinde Camp Dasara Melava 2023: एमआयएमशीही यांची युती होईल. हमास या दहशतवादी संघटनेची ते गळाभेटही घेतील.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर अपेक्षेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. बाळासाहेंबाचे विचार हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. त्यामुळे गेल्यावर्षा आपण बीकेसीत आपला मेळावा केला. काही लोकं म्हणाले तुम्ही शिवाजी पार्क सोडायला नको होतं. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, जिथं बाळासाहेबांचे विचार खुलेपणाने मांडता येतात, त्याला शिवतीर्थाची काय गरज, असा सवाल त्यांनी केला. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात ज्या आसनावर बसून भाषण केलं होतं. त्याचे पूजन केले.

उद्धव यांनी हिंदुत्त्वाशी बेईमानी केली, असा आरोप करताना बाळासाहेबांनी ज्यांना नाकारले त्यांचे तळवे चाटण्याचे काम त्यांनी केल्याची जहरी टीका केली. 'गर्व से कहो हम काँग्रेसी है' असे म्हणण्याची वेळ उद्धव यांच्यावर आल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Eknath Shinde
Shivsena UBT Dasara Melava 2023: 'खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे'; ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

जिथं काँग्रेसचे वाभाडे काढले जातात, तिथं काँग्रेसचे गोडवे गायले जात आहेत. आज सावरकरांचा अपमान ज्यांनी केला, त्यांना मानाचे स्थान दिले जाते. दिल्लीला कुठं जातात, कोणासमोर बोलतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. या बाळासाहेबांनी म्हटले होते की, माझी जेव्हा काँग्रेस होईल, तेव्हा मी माझं दुकान बंद करेल. हे बाळासाहेबांचे शब्द होते. आणि आता हे आम्हाला 'एक फुल दोन हाफ' म्हणणारे कधी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतीर्थावर जिथून 'गर्व से कहो हम हिंदू' है असा नारा दिला जात असत. तिथून 'गर्व से कहो हम काँग्रेसी है', 'गर्व से कहो हम हिंदुत्त्व विरोधी है' अशी वक्तव्ये केली जातात. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिलेली आहे. हिंदुत्त्वाशी बेईमानी तुम्ही केली आहे आणि म्हणून काँग्रेस, समाजवादी कोणाला डोक्यावर बसवले आहे, कोणाला खांद्यावर बसवलंय, कोणाला काहीच कळेना.

सामान्य शिवसैनिकाकडे ठाकरेंचे दुर्लक्ष

एमआयएमशीही यांची युती होईल. हमास या दहशतवादी संघटनेची ते गळाभेटही घेतील. हिजाबूल मुजाहिदीन, लष्करे ए तोएबा यांचीही गळाभेट घेतील. स्वार्थासाठी, खूर्चीसाठी किती लाचारी करतील. शिवसैनिकांचे त्यांना काहीच देणे नाही. शिवसैनिकांविषयी त्यांना प्रेमच नाही. सुमंत रुईकर नावाचा शिवसैनिक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तिरुपतीला चालत गेला होता. त्याचा मृत्यू झाला तरी याचे त्यांना काही देणेघेणे नाही. बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायची त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. साहेबांनी ज्यांना नाकारले त्यांचे तळवे चाटण्याचे काम तुम्ही करताय.

Eknath Shinde
Shiv Sena Dasara Melava : ठाकरेंकडून मुलगा, नातवाच्या उल्लेखामुळे मुख्यमंत्री शिंदे झाले होते संतप्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com