Azad Maidan Dasara Melava: 'आम्हाला गद्दार म्हणता, मग अजितदादांबद्दल मत काय ?' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सवाल

Gulabrao Patil News : मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
Gulabrao Patil News
Gulabrao Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. या मेळाव्यातून मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना संबोधित करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

जवळपास 37 वर्षापासून दसरा गावात कसा होतो, ते आम्ही पाहिलेला नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली, पण ते आमच्यावर गद्दारीचा शिक्का लावत आहेत. मग आम्हाला गद्दार म्हणतात तर आमच्याशी लव्ह मॅरेज करत आमच्यासोबत आलेल्या अजित पवार यांच्याबाबत तुमचं मत काय आहे ?, असा थेट सवाल त्यांनी ठाकरेंना विचारला.

Gulabrao Patil News
Eknath Shinde Dasara Melava 2023 : एकनाथ शिंदेंच्या हातून बाण निसटलाच...

राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, तरी संजय राऊत नावाचे मशीन म्हणतेय की सरकार काही करत नाही. महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेला कोट्यावधी रुपये दिले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले, तरी म्हणतात सरकार काही करत नाही. आपला दवाखाना सुरू केला. या माध्यमातून एक हजार दवाखाने सुरू केले तरी म्हणतात सरकार काही करत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

मागच्या अडीच वर्षात सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोट्यवधी रुपये दिले. 35 हजार गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली, तरी म्हणतात सरकारने काही केलं नाही, असे सांगत संजय राऊत तेरा क्या होगा.., असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला.

तसेच राज्यात सर्वाधिक दौरे करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. माझ्या जळगावमध्ये 13 महिन्यात नऊ वेळा येणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. घरात बसून काही होत नाही, त्यासाठी मैदानात उतरावं लागतं. यासाठी तेवढी तितकी इच्छाशक्ती पाहिजे. इतिहास हा संघर्ष करणाऱ्यांचाच लिहिला जातो, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना केला.

Edited by Ganesh Thombare

Gulabrao Patil News
Shiv Sena Dasara Melava : ठाकरेंकडून मुलगा, नातवाच्या उल्लेखामुळे मुख्यमंत्री शिंदे झाले होते संतप्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com