Baba Siddique Dead Updates : बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी? पोलिस तपासात आकडा आला समोर

BaBa Siddique Police Dead Updates : सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे करनैल सिंह धर्मराज कश्यप आणि शिवा अशी आहेत. हरियाणाच्या जेलमध्ये एकत्र असताना त्यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सुपारी घेतली.
baba Siddique murder accused
baba Siddique murder accusedsarkarnama
Published on
Updated on

Baba Siddique Dead Updates : माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी (ता.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दोन जणांना अटक केली तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणात चौथ्या आरोपीचा सहभाग असल्याचे देखील समोर येत आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपी हे हरियाणाच्या जेलमध्ये एकत्र होते. तेथेच त्यांना बाबा सिद्दिकी यांना मारण्याची सुपारी मिळाली. त्यानंतर हे आरोप पुणे आणि मुंबई येथे काही काळ राहिले.

सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे करनैल सिंह धर्मराज कश्यप आणि शिवा अशी आहेत. करनैल सिंह हरियाणा आणि धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहेत. या दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांच्या माहितीप्रमाणे या आरोपींना बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी अडीच ते तीन लाखांचे कंत्राट मिळाले होते. हत्येनंतर आरोपी हे पैसे आपआपसात वाटून घेणार होते.

baba Siddique murder accused
Raj Thackeray : 'आमदाराची गोळ्या झाडून हत्या.., मुली सुरक्षित नाही'; राज ठाकरे सरकारवर संतापले

दोन आरोपींची कुर्लामध्ये 14 हजार भाडे देत महिनाभरापासून राहत होते. तीनही आरोपींनी आठवण म्हणून तिघांचा एकत्रित फोटो काढला होता. पोलिसांनी करनैल सिंहआणि धर्मराज कश्यप यांना पकडले तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये हा फोटो सापडला. त्यामुळे तिसरा आरोपी शिवा याची ओळख पटवण्यात आली असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

तपास गुन्हे शाखेकडे

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास गु्न्हे शाखेकडे देण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले की बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती. त्यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलिस तैनात होते. तसेच या प्रकरणाशी बिष्णोई गँगचा संबंध आहे? याची देखील सत्यता पडताळण्यात येत आहे.

baba Siddique murder accused
MVA News : 'मविआ'मध्ये जागावाटपावरून तिढा; काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत धाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com