Raj Thackeray : 'आमदाराची गोळ्या झाडून हत्या.., मुली सुरक्षित नाही'; राज ठाकरे सरकारवर संतापले

Raj Thackeray told the statistics of increasing crimes in the state : मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील महिलांविरोधात वाढत्या गुन्ह्यांची आकडेवारी सांगितली.
Raj Thackeray 5
Raj Thackeray 5Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरून मनस पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. वाढत्या गुन्हेगारीचा आकडा वाचून दाखवला.

'आमदाराचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या होते. मुली, महिलांशी निगडीत असलेल्या गुन्ह्यांमध्ये गेल्या सात वर्षांत 47 हजारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हा समृद्ध महाराष्ट्र आहे का?', असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला.

आमदार बाबा सिद्दिकींचा (Baba Siddique) काल खून झाला. खून करणारी माणसं एक यूपीचा, एक हरिणायाचा, बाहेर राज्यातून लोक येत आहे, पोलिसां देखत, इतक्या लोकांसमोर खून होत आहे. महाराष्ट्रात लहान मुलींवर अत्याचार सुरू आहेत, असे सांगून आकडेवारी वाचून दाखवली. 2017 ते 2023 महाराष्ट्रातील आकडे सांगितले. अत्याचार, अपहरण, हुंडाबळी, विनयभंग, लैगिंग अत्याचाराची आकडेवारी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सांगितली.

Raj Thackeray 5
Baba Siddique : हल्लेखोरांची नाॅनस्टाॅप फायरिंगची तयारी? दोघा आरोपींकडून मोठ्या संख्येनं काडतूस जप्त

अत्याचाराची आकडेवारी सांगितली

महाराष्ट्रातील अत्याचाराच्या घटनांमध्ये 2017-4320, 2018-4974, 2019-5412, 2020-4846, 2021-5954, 2022-7084, 2023-7520, तर 2017-6248, 2018-6825, 2019-8382, 2020-5254, 2021-7559, 2022-9297, 2023-9698 मुली महाराष्ट्रातून पळवल्या गेल्याची आकडेवारी वाचून दाखवली. एकंदर महाराष्ट्रात 2023 मध्ये 47 हजार 381 गुन्हे आहेत, असा आकडा वाचून दाखवत, हा समृद्ध महाराष्ट्र का?, असा सवाल मनसे (MNS) पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

Raj Thackeray 5
Devendra Fadnavis: "लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढील एक महिनाच..." राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

बदलापुरच्या घटनेवरून भाजपवर निशाणा

महिलांविषयी काही गोष्ट घडली, तर रांजाच्या पाटलाचा चौरंग करणारा आमचा शिवराय, ती भीती कुठे आहे महाराष्ट्रात? ही महिलांची, लहान मुलांची परिस्थिती असेल, कोणत्या भरवशावर मुलींना शाळेत पाठवायच्या? असा खडा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला. मनसे महिला नेत्यानं बदलापुरचे प्रकरण बाहेर काढलं नसतं, तर काय झालं असते? असा सवाल करत राज ठाकरेंनी भाजपला निशाणा केले. हे सुराज्य, हे स्वराज्य, हे माझं राज्य, हे महाराष्ट्र राज्य, राज्याकडे बघून इतर राज्यांनी उभारी घेतली. तोच महाराष्ट्र अधोगतीला चाललाय यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्रासाठी विधानसभेच्या निवडणुकीला 'ना युत्या, ना आघाड्या', आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला समोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेतील पक्ष असेल. उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू, असा विश्वास देखील राज ठाकरेंनी व्यक्त केला.

अदानींवर निशाणा, कोकणातील माणसांना आवाहन

उद्योगपती अदानी नावाचा माणूस येतो, एअरपोर्ट घेतो, खार जमिनी घेऊन टाकतो. याचं आम्हाला काहीच कसं वाटत नाही. कोकणातील एक मोठी जमीन घेत आहेत. विश्वासानं सांगतो, जमिनी विकू नका. पायाखालची जमिनी गेली, की अस्तित्व राहणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. गुजरातमध्ये जाऊन पाहा. गुजरातमधील कायदा बघा. शेतीची जमीन असेल, तर ती विकू शकत नाही. ती विकायची असेल, तर ती शेतकऱ्याला विकू शकता. ती देखील राज्यातलाच शेतकऱ्यांना विकू शकता. प्रत्येक जण, आपपाल्या राज्याचा विचार करत आहे. स्वतः विचार करत आहे. महाराष्ट्रात फक्त लिलाव मांडला जातो. महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा उद्धवस्त करायची आहे. सगळ्याचे डोळे महाराष्ट्रावर लागले आहेत. कोण येत आहे, कोण जात आहे, कशाचा कशाला थांगपत्ता लागत नाही, असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com