Baba Siddique : 25 दिवसांपासून रेकी, दबा धरून बसलेले अन् झाडल्या गोळ्या; सिद्दीकींच्या हत्येमागील आरोपींची नावे अन् फोटो समोर

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय आणि बॉलीवूड एकच खळबळ उडाली आहे. हत्येमागे एका बड्या ‘गँग’चा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीनं पोलिसांकडून तपास केला जात आहे.
Baba Siddique .jpg
Baba Siddique .jpgsarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर ही घटना घडली. तीन जणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता. या तीनमधील दोघांना पकडण्यात यश आलं आहे. तर, एकजण फरार आहे.

गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा दावा पकडण्यात आलेल्या आरोपींनी केला आहे. तीनही आरोपींचा फोटो समोर आला आहे. तीनमधील दोघांची नावे करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप, अशी आहेत. करनैल सिंह हरियाणा आणि धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे.

आरोपी 25 ते 30 दिवसांपासून वांद्र्यातील परिसराची रेकी करून पाळत ठेवत होते. या हत्येमागे आणखी काहींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Baba Siddique murder accused .jpg
Baba Siddique murder accused .jpgsarkarnama

6 राउंड फायर अन्...

वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी सिग्नलजवळ आमदार झिशान सिद्दीकी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. येथेच सिद्दीकी यांच्यावर दबा धरून बसलेल्या तिघांनी गोळीबार केला. आरोपींनी एकूण 6 राउंड फायर केले. त्यातील चार गोळ्या सिद्दीकी यांना लागल्याचं बोललं जात आहे. एक गोळी सिद्दीकी यांच्या छातीत लागली. गोळीबारानंतर सिद्दीकी यांना तातडीनं लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

Baba Siddique .jpg
Ajit Pawar On Baba Siddique Shot Dead: सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

बंदूक जप्त

बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला होता, ती मुंबई पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींनी 9.9 एमएम बंदुकीचा हत्येसाठी वापर केल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com