Ahmednagar News : राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य सचिव संग्राम कोते पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांची,विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बैठक घेतली. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत सोडवण्याचे आश्वासन कोते पाटील यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच संग्राम कोते पाटील(Sangram Kote Patil) यांच्याकडे अजित पवार गटाच्या मुख्य कार्यकारिणीच्या सचिवपदाबरोबरच युवक काँग्रेस आणि विद्यार्थी संघटनेच्या समन्वयकपदी नियुक्ती करत मोठी जबाबदारी दिली आहे.कोते यांनी नियुक्तीनंतर लगेचच कामाला सुरूवात केली असून विद्यार्थ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकही घेतली आहे.पुणे विद्यापीठात ही बैठक पार पडली.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. हे दुहेरी संकट असतानाच, दुष्काळासदृश परिस्थितीत शेतकरी आणि त्यांच्या मुलांचे शैक्षणिक प्रश्न वाढले आहेत. आर्थिक संकटांचा सामना शेतकरी आणि त्यांचे शिक्षण घेणारे मुलांसमोर आहे. हे प्रश्न सरकारी पातळीवर प्रभावी मांडण्यासाठी ही बैठक घेतल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली.
पुणे विद्यापीठात (Pune University) उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वाधिक आहेत.सध्या राज्यावर दुष्काळाचे संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. याच शेतकऱ्यांचे मुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असून, ते देखील आर्थिक संकटांना समोरे जात आहे. विद्यार्थ्यांना घराकडून येणारी आर्थिक मदत येणे बंद केले आहे. या विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक शुल्क भरताना अडचणी येत आहेत. हे शुल्क माफ व्हावे, अशी मागणी या बैठकीत विद्यार्थ्यांनी केले.याचबरोबर पुणे विद्यापीठातील विविध अडचणींसंदर्भात विद्यार्थ्यांनी कैफियत मांडल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संग्राम कोते म्हणाले,पुणे विद्यापीठात मराठवाडा,विदर्भ,उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत.राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींसामोरे जावे लागत आहे. दुष्काळमुळे घराकडून येणारी मदत गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाही.
राज्य सरकारने राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.हे जाहीर करताना यात वेगवेगळे आणि किचकट नियम आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती घेताना अडचणी येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटून राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवून घेणार असल्याचेही संग्राम कोते यांनी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.