Bachchu Kadu Protest : आंदोलन संपताच सरकारकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल, तर बच्चू कडूंच्या 'हवामहाला'ची उच्चस्तरीय चौकशी करण्याची भाजप आमदाराची मागणी

Devendra Fadnavis Loan Decision : प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी करत नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन केलं. त्यांनंतर सरकारने कर्जमाफी संदर्भात 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं. मात्र, आंदोलन संपताच सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Bachchu Kadu Nagpur protest pushes government to promise farmers’ loan waiver by June 30, but police file cases against protesters.
Bachchu Kadu Nagpur protest pushes government to promise farmers’ loan waiver by June 30, but police file cases against protesters.Sarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu Protest : प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी करत नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन केलं. त्यांनंतर सरकारने त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर कर्जमाफी संदर्भात मुंबईत बैठक घेण्यात आली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं. बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे सरकारने आता 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं मान्य केलं आहे.

त्यामुळे कडू यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश आल्याचं दिसत आहे. मात्र, बच्चू कडू यांचं आंदोलन संपताच सरकारने शेतकरी नेत्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान नागपुरकरांसह हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. बेकायदेशीरपणे महामार्ग रोखला.

Bachchu Kadu Nagpur protest pushes government to promise farmers’ loan waiver by June 30, but police file cases against protesters.
Banjara Community Protest : बच्चू कडू यांच्यानंतर आता बंजारा समाजानं रोखला समृद्धी महामार्ग, महायुती सरकारसमोर पुन्हा नवं संकट

ज्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केले आहेत. त्यामुळे आंदोलन संपताच पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करायला सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.

तर आंदोलकांनी आंदोलनासाठी परवानगी दिलेल्या जागेऐवजी 2 किमी मागेच वर्धा येथे आंदोलन करत महामार्ग अडवल्यामुळे 30 तासांहून अधिक वेळ महामार्गावर कोंडी झाली. यामुळे नागरिकांचे हाल झाले.

तसंच अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे शिवाय वाहतुकीत अडथळा निर्माण करणे अशा कलमांखाली हिंगणा पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Bachchu Kadu Nagpur protest pushes government to promise farmers’ loan waiver by June 30, but police file cases against protesters.
Uddhav Thackeray News : तुमच्याविरोधात अटक वॉरंट का काढू नये? उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस

हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा

तर दुसरीकडे, भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी केली आहे. बच्चू कडू यांनी समाजसेवेच्या नावाखाली 72 एकर परिसरात खंडणीच्या पैशातून हवामहाल बांधल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे.

बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत.

यासाठी त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे. शिवाय बच्चू कडूंच्या या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करावी या मागणीसाठी तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com