Bachchu Kadu News: ...प्रार्थना ऐकली अन् बच्चू कडू यांचं मत बदललं; हे सगळं कशासाठी करायचं ?

Maharashtra Politics : 'वाटोळं करेन' म्हणणारे बच्चू कडू अचानक नरमल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली की अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरु होते. मंत्रिपदासाठी ते अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला अधूनमधून इशारे देत असतात. सत्तेत राष्ट्रवादीच्या सहभागानंतर ते मंत्रिपदाबाबत स्वत:च संभ्रमात आहेत. पण आज ते नरमल्याचे दिसले. "काल रात्री एक प्रार्थना ऐकली अन् माझं मत बदललं," असे ते म्हणाले.

बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची माहिती दिली. मंत्रिपदावर यापुढे दावा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी वर्षभरापूर्वी गुवाहाटीला का जावे लागले? याबाबतचे देखील स्पष्टीकरण दिले आहे. 'वाटोळं करेन' म्हणणारे बच्चू कडू अचानक नरमल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Bachchu Kadu
Pune News : शरद पवारांचा फोटो दाखवून अनेकांना गंडा घालणारा पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादीच्या गटाच्या सरकारमधील सहभागामुळं संधी हुकणार असल्याने कडू हे नाराज आहेत. याबाबत विचारलं असता 'मी नाराज नाही, पण नाराज झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही,' असा सूचक इशारा त्यांनी दिला होता. मंत्रिपदाच्या संभाव्य यादीत नाव नसल्याची शक्यता दिसताच त्यांनी पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर त्यांनी माघार घेतली.

"मंत्री व्हावं असं कोणाला वाटतं नाही. पण काल रात्री मी एक प्रार्थना ऐकली. 'इतनी शक्ती हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना… ही ती प्रार्थना होती. ती ऐकून माझं मत बदललं. मला वाटलं हे सगळं कशासाठी करायचं? पुन्हा त्या रांगेत का बसायचं?,’ असे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu
Bihar Vidhan sabha : भाजपच्या दोन आमदारांना अध्यक्षांनी सभागृहाच्या बाहेर काढले ; व्हिडिओ पाहा..

कोणा-कोणाला पद देणार?

'एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगासाठी मंत्रालय तयार करून मोठं काम केलं आहे. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन. सामान्य माणसासाठी झटणारे ते मुख्यमंत्री आहेत. आज ते पेचात आहेत. त्यांना अडचण होऊ नये. कोणा-कोणाला पद देणार? अशावेळी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना मदत करणं गरजेचं आहे, असं कडू म्हणाले."मुख्यमंत्र्यांनी मला १७ तारखेला भेटायला बोलावलं आहे. त्यानंतर मी पुढील निर्णय सांगणार आहे. मात्र, आताच्या परिस्थितीत मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मला मंत्रिपदाची हाव नाही..

‘आमच्या आई-वडिलांनी ते कधी शिकवलं नाही. मला मंत्रिपदाची हाव नाही आणि नसेल. मला कुटुंबासाठी आणि मतदारसंघातही वेळ द्यायचा आहे. पद घेतल्यावर मला लोकांसाठी काम करता येणार नाही. त्यामुळं मी मंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. फक्त ते आज जाहीर करणार नाही," असे कडू म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com