
Bachchu Kadu court Case : प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या विरुध्द मंत्रालयातील आयटी विभागाच्या सचिवाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आज गुरूवार दि.( ६ एप्रिल) रोजी सुनावणी पार पडली. ही सुनावणी आता २५ एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
आज या प्रकरणी सुनावणीसाठी पोहोचण्यास उशीर झाल्याने सरकारी वकिलांना न्यायालयाने खडे बोल सुनावले. न्यायालयात तपासअधिकारी तसेच, सरकारी वकील हजर नसल्यानं, विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे संतप्त झाले. यावेळी न्यायाधीशांनी उशिरा आलेल्या सरकारी वकिलांना खडे बोल सुनावले. तसेच या प्रकरणाचे पुरावा, सीडी अद्याप सादर न केल्यानं कोर्टानं सरकारी पक्षाची खरडपट्टी काढली. या प्रकरणी सुनावणी २५ एप्रिल पर्यंत तहकूब केली.
मागील सुनावणीत बच्चू कडू यांनी गुन्हा नाकबूल केला होता. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात, मंत्रालयातील समाज कल्याण अधिकारी यांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद आहे. 26 सप्टेंबर 2018 रोजी उप सचिव प्रदीप चंद्रन यांना शिवीगाळ आणि लॅपटॉपने मारहाणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
(Edited By- Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.