Amravati News : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त 21 वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'या निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणा दांपत्यांना अटक झाली होती. तेव्हापासून राणा कुटुंब हे ठाकरेंवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही.
आजही राणांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. हनुमान चालीसा प्रकरणी तत्कालीन ठाकरे सरकारने राणांना अटक केली होती. त्यानंतर त्या 14 दिवस तुरुंगात होत्या. त्यावेळचा तुरुंगातील अनुभव सांगताना आज नवनीत राणांना भर कार्यक्रमात अश्रू अनावर झाले.
नवनीत राणा म्हणाल्या, ''आम्हाला एक महिना तुरुंगामध्ये ठेवणार होते. माझी लहान मुलेही मला विचारत होते तुम्हाला कशामुळे तुरुंगामध्ये ठेवले'', असं सांगत असतानाच नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. यावेळी व्यासपीठावर असलेले आमदार रवी राणा हे देखील भावून झालेले पाहायला मिळाले.
''उद्धव ठाकरे हे पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना पक्षाची विचारधारा सांभाळता आली नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे देखील आश्रू ढाळत असतील'', असा टोलाही यावेळी नवनीत राणांनी ठाकरेंना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.