Bachchu Kadu News : आक्रमक बच्चू कडुंची सचिन तेंडुलकरसाठी राज्यभर 'भीकपेटी' !

Sachin Tendulkar : तेंडुलकरांनी भारतरत्न परत करावा
Bachchu Kadu, Sachin Tendulkar
Bachchu Kadu, Sachin TendulkarSarkarnama

Mumbai News : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जुगारची जाहिरात करणे बंद करावी, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गणपती मंडळासमोर सचिन तेंडुलकर यांच्या नावे भिकपेटी ठेवली आहे. राज्यातील सर्व गणपती मंडळासमोर भिकपेटी ठेऊन यामधील रक्कम सचिन तेंडुलकर यांना देणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी बुधवारी भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणे योग्य नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. यावेळी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर आंदोलन केले होते. (Maharashtra Political News)

Bachchu Kadu, Sachin Tendulkar
Supriya Sule On Ajit Pawar : अमित शाहांचं कौतुक, अजितदादांना टोमणा, तर फडणवीसांवर टीका; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

यावेळी सचिन तेंडुलकर यांनी जाहिरात बंद नाही केली, तर संपूर्ण महाराष्ट्रातील गणपती मंडळासमोर भीकपेटी ठेवणार आहे. त्या भीकपेटीत जमा झालेली रक्कम सचिन तेंडुलकर यांना देणार असल्याचा इशारा कडूंनी यावेळी दिला. माजी क्रिकेटपट्टू तेंडुलकरविरोधत बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. यामुळे आगामी काळात ते काय करणार, याकडे लक्ष आहे.

काय म्हणाले बच्चू कडू ?

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, 'भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जुगारची जाहिरात बंद करावी. अन्यथा राज्यातील सर्व गणपती मंडळासमोर भीकपेटी ठेवणार आहे. त्यामधील जमा झालेली रक्कम सचिन तेंडुलकर यांना देणार आहे. सचिन तेंडुलकर यांनी भारतरत्न पुरस्कार परत करावा. देशातील स्वतंत्र संग्रामात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना अजूनपर्यंत भारतरत्न मिळाला नाही, मात्र सचिन तेंडुलकर यांना मिळाला. ऑनलाइन जुगार हा वाईट असून सचिन तेंडुलकर यांनी भारतरत्न पुरस्कार परत करावा.'

(Edited by Sunil Dhumal)

Bachchu Kadu, Sachin Tendulkar
Amit Shah News : महिला आरक्षण आमच्यासाठी राजकीय नाही, तर...; अमित शाह विरोधकांवर कडाडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com