Bachchu Kadu News : गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार; पण एका दिवसापुरते !

Maharashtra Cabinet Expansion : राज्य सरकारच्या वतीने जूनमध्ये दिव्यांग महोत्सवाचे आयोजन
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

Bachchu Kadu Ministership : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले. या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आठ आमदारांसह अपक्ष आमदार बच्चू कडू यांचीही वर्णी लागण्याची मोठी चर्चा आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आज-उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल, या चर्चेमुळे अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

Bachchu Kadu
Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेला अडीच वर्षापासून मिळेना नगरसचिव; प्रोटोकॉल अधिकाऱ्यावर सोपवली अतिरिक्त जबाबदारी

आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे (शिंदे गट) (Shivsena) भरत गोगवले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमणराव पाटील तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच त्यांना मिळणाऱ्या खात्याबाबतही माहिती आहे.

भरत गोगवले यांना जलसंधारण, संजय शिरसाट यांच्याकडे परिवहन किंवा समाज कल्याण, बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काही जाहीर होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित आमदारांची धाकधूक वाढल्याचे दिसत आहे. (Marathi Latest News)

Bachchu Kadu
UPSC Result 2023 : 'एमआयडीसी'त काम करण्याचा विचार करणारा सोहम बनणार 'आयएएस'

दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना एका दिवसासाठी मंत्री होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारच्या वतीने जून महिन्यात दिव्यांग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान दिव्यांगांसंबंधित काही निर्णय घेण्यात येणार आहेत. ते निर्णय अंतिम करण्यासाठी एका मंत्र्याला असलेले सर्व अधिकार त्या दिवशी आमदार बच्चू कडू यांना देण्यात येणार आहेत. (Bachchu Kadu will be Minister)

Bachchu Kadu
NCP leader Prakash Patil News : राष्ट्रवादीचे मंगळवेढा अध्यक्ष पी. बी. पाटील अपघातात गंभीर जखमी

राज्य सरकारच्या (State Government) वतीने 'दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्या उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड केली आहे. याबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. यात राज्यस्तरीय सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव, आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे, उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. आता मंत्रिमंडळ होईल तेव्हा होईल, मात्र बच्चू कडू यांचे एका दिवसाचे का असेना मंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार कडू यांनी मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कडू म्हणाले होते, "सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होण्यास काही अडचण नसावी. आता एका मंत्र्याला अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सांभाळावे लागत आहे. त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न सुटण्यास मर्यादा येतात. मंत्रिपद कुणाला मिळेल हा नंतरचा भाग आहे, पण मंत्रिमंडळ विस्तार करणे फार महत्वाचे आहे. यापूर्वी दिव्यांग मंत्रालयाच्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला शब्द दिलेला आहे. तो ते पूर्ण करतील."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com