Badlapur BJP: भाजपचा बदलापूरमध्येच आणखी एक प्रताप! उपनगराध्यक्ष बनवलेल्या नेत्या दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपी; सध्या जामीनावर बाहेर

Badlapur BJP: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक बनवले होतं, पण विरोध होताच त्याचा राजीनामा घेतला.
Priyanka Damle
Priyanka Damle
Published on
Updated on

Badlapur BJP: महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय ताकद आणि गुंडगिरी यांची चांगलीच युती पाहायला मिळते आहे. त्यातूनच प्रमुख पक्षांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या व्यक्तींना नगरसेवक बनवण्यासाठी धडपड सुरु असल्याचं दिसतं आहे. भाजपनं बदलापूरमध्ये शाळेतील ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक बनवलं होतं. त्यानंतर आता उपनगराध्यक्षपदी देखील दंगलीतीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराची निवड केली आहे.

Priyanka Damle
Sangram Patil: केवळ युकेचं नागरिकत्व असल्यानं डॉ. संग्राम पाटील सुटले? असिम सरोदेंची पोस्ट चर्चेत

बदलापूरमधील एका प्रतिष्ठीत शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेला शाळा प्रशासनातील पदाधिकारी तुषार आपटे याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक बनवलं होतं. पण याला माध्यमांसह सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानं भाजपला बॅकफूटवर यावं लागलं आणि त्यांनी या तुषार आपटेचा राजीनामा घेतला. पण आता गुन्हेगारांना उमेदवाऱ्या देण्याचं हे प्रकरण इथेच थांबलेलं नाही.

Priyanka Damle
फक्त भाजपविरोध की आणखी काही? मुंबई एअरपोर्टवर ताब्यात घेतलेले डॉ. संग्राम पाटील कोण आहेत?

कारण याच बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका दामले यांची निवड झाली. भाजपचा नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी युतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्याची जागा दिली आहे. बदलापूरमधील शाळेतील या अत्याचार प्रकरणानंतर उसळलेल्या दंगलीतील दामले या आरोपी आहेत. त्यांच्यावर दंगलीत सहभागी असल्याबद्दल गुन्हाही दाखल झाला आहे. सध्या त्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

Priyanka Damle
PMC Election: 'रस्ता चुकलेल्या' भाजपच्या प्रचारगाड्या नागपूरातून थेट पुण्यात! पण करताहेत राष्ट्रवादीचा प्रचार; विषय पोहोचला पोलीस आयुक्तालयात

दरम्यान, पुण्यातही भाजपनं कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अर्थात जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. तसंच हत्या, अपहरण, गोळीबार, पोलिसांवर हल्ला असे गंभीर आरोप असलेल्या गुंड रोहिदास चोरघे याची पत्नी प्रतिभा चोरघे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडं पुण्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गुंड बंडू आंदेकर याच्या घरातील दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना. या दोघी आणि बंडू आंदेकर असे तिघेजण सध्या आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात येरवडा तुरुंगात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com