Akshay Shinde
Akshay Shindesarkarnama

Video Badlapur rape case Update : बदलापूर प्रकरणात पोलिस आयुक्तांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, आरोपी अक्षय शिंदेची मुलींसमोर ओळख परेड होणार?

Akshay Shinde Police Badlapur rape case Court : बदलापूर प्रकरणात दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने शाळेवर देखील ठपका ठेवल्याची माहिती आहे.
Published on

Badlapur rape case Update : बदलापूरमध्ये लहान मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड होण्याची शक्यता आहे. ओळख परेडसाठी विशेष तपास पथकाने न्यायालयाकडे अर्ज केला आहे. न्यायालयाने परवानगी दिली तर दंडाधिकाऱ्यांसमोर शाळेतील दोन्ही मुलींना आणण्यात येईल. त्यांच्यासमोर अक्षयची ओळख परेड होईल.

दरम्यान, या प्रकरणातील अपडेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले होते.

न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना देखील या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

आरोपी अक्षयचा घराची झडती घेण्यात आली असून त्याचा मोबाईल देखील ट्रेस करण्यात आला आहे. त्यामुळे महत्त्वाचे पुरावे पोलिसांची हाती लागण्याची शक्यता आहे.

Akshay Shinde
Cooperative Sugar Mills : शेतकरी, साखर कारखान्यांच्या हितासाठी शिंदे सरकार अखेर कठोर

बदलापूरमधील चिमुकलींवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरून नागरिकांनी आपली रागा वाट करून देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

दोन सदस्यांची समिती

बदलापूर प्रकरणात दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने शाळेवर देखील ठपका ठेवल्याची माहिती आहे. हा अहवाल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात केला आहे.

Akshay Shinde
Ajit Pawar : 'उकिरडे उकरत बसायचे नसतात', PM मोदींच्या प्रश्नावर अजितदादा संतापले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com