Badlapur Case big Update : बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट ; अखेर 'त्या' शाळेच्या अध्यक्षासह सचिवास अटक!

Badlapur rape case co-accused Tushar Apte, Uday Kotwal arrested : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या दुसऱ्याची दिवशीच आपटे अन् कोतवाल यांना पोलिसांनी कर्जतमधून केली अटक
Tushar Apte and Uday Kotwal
Tushar Apte and Uday KotwalSarkarnama
Published on
Updated on

Badlapur rape case adn Tushar Apte, Uday Kotwal : राज्यभरात खळबळ माजवलेल्या बदलापूर अत्याचार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा एन्काऊटरमध्ये ठार झाला. त्यानंतर आता या प्रकरणातील फरार असलेले सहआरोपी ज्या शाळेत चिमुरडींवर अत्याचार झाला त्या शाळेचे अध्यक्ष तुषार आपटे आणि सचिव उदय कोतवाल यांनाही ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखा या दोन्ही आरोपींना 'SIT'कडे सोपवणार आहे.

विशेष म्हणजे कालच उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. शिवाय आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरांगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरेही ओढले होते. अखेर आज या दोन्ही आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतलं आहे. दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Tushar Apte and Uday Kotwal
Badlapur rape case Update : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वतःवर गोळ्या झाडल्या; आत्महत्या की एन्काऊंटर?

शाळेत घडलेला प्रकार पोलिसांना न कळवणे, पुरावे नष्ट करणे असे या दोघांवर आरोप होते. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास सव्वा महिना हे दोघे फरार होते. त्यामुळे कोर्टानेही पोलिसांवर ताशेरे ओढले होते. तर हे सहआरोपी भाजपशी संबंधित असल्याचा विरोधक आरोप करत होते.

Tushar Apte and Uday Kotwal
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे 'एन्कांऊटर' प्रकरणात मोठी अपडेट

शाळेतील सीसीटीव्ही गायब कसं झालं, आरोपी मुलींच्या शौचालयात कसा पोहचला याबाबत आता सविस्तर चौकशी होवू शकते. कारण, घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचं कोर्टात सांगितलं गेलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com