Jitendra Awhad Attack Case : जितेंद्र आव्हाडांवर हल्ला करणाऱ्या 'स्वराज्य'च्या दोघांना जामीन

Swarajya Party And Sambhajiraje Chhatrapati : आव्हाडांवरील हल्ल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव व उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Swarajya Party Leaders
Swarajya Party LeadersSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला होता.

या प्रकरणी अटकेत असलेल्या स्वराज्य पक्षाच्या दोन जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव व उपाध्यक्ष अंकुश कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ आव्हाड यांच्या गाडीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. त्यात गाडी फोडण्यात आली होती. त्यानंतर हल्ल्याची जबाबदारीही पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली होती.

Swarajya Party Leaders
Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : परमबीर सिंगांची विश्वासार्हता काय? सलील देशमुखांचा पलटवार

या प्रकरणी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव व उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या दोघांना देखील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जमीन मिळाल्यानंतर जाधव आणि कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, आजवर राजकीय पक्षानी शिवराय, शाहू महाराज यांना राजकारणासाठी वापरले आहे. यापुढे संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते शिवराय, शाहू महाराज तसेच वंशजंचा अवमान सहन करणार नाही, मग समोर कोणीही असू द्या, असा इशाराही दिला.

उपाध्यक्ष अंकुश कदम म्हणाले, आमच्या पक्षाचे प्रमुख, तसेच शिव शाहूंचे वंशज संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही. राजकारणासाठी राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावीत. धार्मिक जातीय तेढ वाढवू नये, अशी अपेक्षाही कदम यांनी व्यक्त केली आहे.

Swarajya Party Leaders
Video Maratha Protester Vs Raj Thackeray : मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं; मुक्कामी असलेल्या धाराशिवमध्ये वातावरण तापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com