Video Maratha Protester Vs Raj Thackeray : मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं; मुक्कामी असलेल्या धाराशिवमध्ये वातावरण तापलं

Maratha Reservation : राज ठाकरेंची भेट नाकारल्यानंतर धाराशिवमध्ये त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आहेत.
Raj Thackeray Maratha reservation
Raj Thackeray Maratha reservation Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर सुरुवात होत आहे.मात्र, आता त्यांच्या दौर्या दरम्यानच मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट नाकारल्यानंतर धाराशिवमध्ये त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आहेत. यावेळी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांसमवेत बाचाबाची झाली असून एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौर्यातील पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर फोकस केला आहेत. आज त्यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही, असे मोठे विधान केलं होतं. त्याचे पडसाद आता तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

एकीकडे सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आणि ओबीसीमधील समावेशाच्या मागणीवरुन संघर्ष पेटला असतानाच राज ठाकरे यांनी हे विधान केल्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आपल्याला राज ठाकरेंशी चर्चा करायची आहे अशी मागणी धरत आंदोलकांनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

Raj Thackeray Maratha reservation
Ajit Pawar : अजितदादा आता बारामतीतच भाकरी फिरवणार; म्हणाले, 'माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, मला...'

या सगळ्या राड्यानंतर राज ठाकरे मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी खाली उतरले. मराठआ आंदोलकांशी बोलण्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर मराठा आंदोलकांना चर्चेसाठी बोलावण्यात आलं.मराठा आंदोलक आणि ठाकरे यांच्यात आता चर्चा सुरू आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते..?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये मीडियाशी संवाद साधताना बेरोजगारी, परप्रांतिय,आरक्षण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.ते म्हणाले, बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा एवढा मोठा आहे की, त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.येथील मूळच्या लोकसंख्येसाठी होत नाहीत.बाहेरून आलेल्या लोकसंख्येसाठी या सोयी सुविधा होत आहेत.

परप्रांतिय लोकांसाठी राज्याचा सर्वाधिक पैसा खर्च होत आहे.आपल्याकडे नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. पण आपल्याकडच्या तरुणांना माहितीच नसतं की, नोकऱ्या कुठे निर्माण झाल्या आहेत.महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या यूपी आणि बिहारमधील वर्तमानपत्रात जाहिराती येतात आणि महाराष्ट्रात येत नाहीत.असा टोलाही सरकारला लगावला.

राज्यातील उद्योगधंद्यात नोकऱ्या आहेत, हे बाहेरच्या लोकांना कळतं आणि आपल्या पोरांना कळत नाही. त्यांनाही नोकरी करायची असते, त्यांचं आयुष्य उभं करायचं असतं. अशा परिस्थितीत आपल्य राज्य चालवंल जातंय. गेली अनेक वर्षे असंच चालवलं जातंय. मी त्यावर गेली काही वर्षे सातत्याने बोलत आहे.

बेरोजगारांची यादी यायची, तीही आता बंद झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना आपल्याला आरक्षणाची गरजच नाही. पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना संधी द्या. त्यातूनही उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार करत नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray Maratha reservation
Chandrakant Patil : महाविकास आघाडीला फटकारलं, अन् आंबेडकर यांचं चंद्रकांत पाटलांनी कौतुक केलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com