Bala Nandgaonkar Emotional : ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर बाळा नांदगावकर भावूक, विठुरायाला आता घातले वेगळेच साकडे!

Bala Nandgaonkar Raj-Uddhav Thackeray Unite : राजकीय इच्छा आणि महत्त्वाकांक्षा याच्या पलिकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
Bala Nandgaonkar Raj-Uddhav Thackeray Unite
Bala Nandgaonkar Raj-Uddhav Thackeray Unitesarkarnama
Published on
Updated on

Raj-Uddhav Thackeray Unite : मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे-राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर एकाच मंचावर आले. दोघांनीही एकत्रित राहणार असल्याचे सांगितले. राजकीय भांडण विसरून दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या नेते, कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसे नेते बाळा नांदगावकर हे भावूक झाले. त्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त करत विठ्ठलाला जीवनात ही घडी अशीच राहू दे, असे साकडे घातले.

बाळा नांदगावकर म्हणाले, 'गेली 2 दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला. बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील.'

'राजकीय इच्छा आणि महत्त्वाकांक्षा याच्या पलिकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे आणि आज मी याची देहा याची डोळा हे बघून सगळ्यात आनंदी झालो. त्यात आज आषाढी सारखा अतिशय पवित्र दिवशी हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पांडुरंगाकडे एकच मागणे आहे.जीवनात ही घडी अशीच राहू दे.', असे नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Bala Nandgaonkar Raj-Uddhav Thackeray Unite
Rane Kadam Gorhe criticism : ठाकरे बंधूंच्या एकजुटीने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली; राणे, कदम, गोऱ्हेंच्या टीकेमागचे राजकारण उघड!

बाळा नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना फेसबूकवरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे एकत्रित व्यासपीठावर उभे असलेला फोटो देखील शेअर केला आहे.

संदीप देशपांडे आक्रमक

दोन भाऊ सत्तेसाठी एकत्र आले असल्याची टीका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जात आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, नारायण राणे, सुनिल तटकरे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे एकाच रांगेत बसले असलेल्या फोटो ट्विट केला आहे. तसेच हे सत्तेसाठी एकत्र आले तर चालतात पण दोन भाऊ नाही चालत का? अशी विचारणा करत 'तुम्ही का?' एकत्र आला असा प्रतिप्रश्न केला आहे.

Bala Nandgaonkar Raj-Uddhav Thackeray Unite
Bachchu Kadu : "आम्ही स्वतःच्या कष्टाचंच खातो..." फडणवीसांनी विठ्ठलाची पूजा करताच बच्चू कडूंनी टायमिंग साधलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com