Ajit Pawar, Balasaheb Thorat
Ajit Pawar, Balasaheb ThoratSarkarnama

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर अजित पवार म्हणाले, "त्यांना फोन केला होता..."

Ajit Pawar News : खदखद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेससह महविकास आघाडीत चिंता
Published on

Maharshtra Congress : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. सत्यजीत तांबे यांच्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. थोरातांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे (Congess) विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. त्यानंतर आता थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. दरम्यान मंगळवारी (ता. ७) पुण्यात असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना थोरात यांचा राजीनामा आणि काँग्रेसमधील गटबाजीवरून प्रश्न विचारला.

Ajit Pawar, Balasaheb Thorat
Ashok Chavan News : वाढदिवसाच्याच दिवशी थोरातांनी विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा देणे दुर्दैवी..

अजित पवार म्हणाले, "बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांतूनच ऐकली. थोरात यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना फोन केला होता. त्यांना म्हणालो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस, आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं याच शुभेच्छा! दरम्यान एक बातमी कानावर येतेय, त्याबाबत आता तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. यावर त्यांनीच सांगितले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे."

यानंतर पवार यांनी थोरात काय म्हणाले याबाबत माहिती दिली. अजित पवार यांनी सांगितले, "बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेणार आहे."

Ajit Pawar, Balasaheb Thorat
Kasba By-Election : ...म्हणून मी बंडखोरी केली; दाभेकरांनी सांगितलं बंडखोरीचं कारण

दरम्यान काँग्रेसचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी थोरात यांच्या राजीनाम्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत अशोक चव्हाण म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे.

Ajit Pawar, Balasaheb Thorat
Radhakrishn Vikhe Patil; `महाविकास`च्या पराभवाची जबाबदारी घेणार की नाही?

आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच थोरात यांनी मोठे पाऊल उचलल्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात आगामी काळात कोणता निर्णय घेणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी, कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत, असे सूचक वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com