शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कब्जा; करारनामा मात्र गुलदस्त्यात

Shivsena : उद्धव ठाकरे समर्थकांनी यावेळी शाखेत शिरण्याचा प्रयत्न केला होता...
Shivsena , Dombiwali Latest News
Shivsena , Dombiwali Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली शिवसेना शाखेवरुन ऑगस्ट महिन्यात शिंदे गट व ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता. त्यावेळी शाखेचे दोन गटात विभाजन झाल्याचे पहायला मिळाले होते.

दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा शिंदे समर्थकांनी म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेने गुरुवारी (ता.२७ ऑगस्ट) सकाळी शाखेवर एन्ट्री करत शाखेवर कब्जा केला. (Shivsena , Dombiwali Latest News)

शाखेचा रितसर व्यवहार झाला असून कायदेशीररित्या शाखा आम्ही ताब्यात घेतली आहे,असा दावा यावेळी शिंदे गटाकडून करण्यात आला. ठाकरे समर्थकांनी यावेळी शाखेत शिरण्याचा प्रयत्न केला, परंतू पोलिसांनी यात हस्तक्षेप करीत दोन्ही गटात वाद होऊ नये म्हणून ठाकरे समर्थकांना तेथून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. बाळासाहेबांच्या शिवसेनेने शाखेवर कब्जा केला असला तरी करारनामा दाखविण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याने हा करारनामा नेमका कोणाच्या नावावर झाला. हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

डोंबिवली मध्यवर्ती शिवसेना शाखेचा ताबा घेण्यावरुन ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच शिंदे व ठाकरे गटात तुफान राडेबाजी झाली होती. शिंदे गटाला ठाकरे समर्थकांनी अडवित जोरदार विरोध केला होता. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाला शांत राहण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात शिवसेना शाखेचे शिंदे व ठाकरे गटात विभाजन झाले होते. शाखेतील चार पैकी दोन खोल्या शिंदे गटाकडे तर दोन खोल्या ठाकरे गटाकडे गेल्या होत्या. या विभाजनानंतर शाखेवर फारशी वर्दळ दिसत नसे, शाखेत जणू भयाण शांतता पसरल्याचे वातावरण होते.

Shivsena , Dombiwali Latest News
पिंपरीत दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या; कुणाची ताकद किती?, कोण मारणार बाजी?

दोन महिन्यानंतर दिवाळीची धामधूम अद्याप संपली नसतानाच शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत गुरुवारी सकाळीच फटाके फुटल्याचे पहायला मिळाले. सकाळी 9 च्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे राजेश मोरे, राजेश कदम, दिपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, महेश पाटील, जनार्दन म्हात्रे, विश्ननाथ राणे यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेवर कब्जा केला. कायदेशीर रित्या शाखा आमच्या ताब्यात आली असल्याचे सांगत ठाकरे गटाच्या ताब्यातील कार्यालयावर देखील शिंदे गटाने कब्जा केला.

यावेळी ठाकरे गटातील सदानंद थरवळ, कविता गावंड यांसह महिला आघाडीने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक पोलिसांनी हस्तगत करीत ठाकरे गटाच्या समर्थकांना ताब्यात घेत त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

Shivsena , Dombiwali Latest News
गडकरींनी ठरवले; नागपूर-हैदराबाद साडेतीन तासांत, तर पुण्यासाठीही होणार मोठा रस्ता !

कोरोना कालखंडाच्या आधीपासून या शाखेच्या जागेची विक्री करारनामाचे काम सुरु होते. 14 ऑक्टोबर रोजी ते पूर्ण झाले असून बाळासाहेबांच्या शिवसेनेची आता ही शाखा आहे, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. वर्धान कंपनी आणि शिंदे समर्थक गटातील जितेन पाटील यांच्यात रजिस्ट्रेशन झाल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात आले आहे. मात्र हा करारनामा दाखविण्यास ते तयार नसल्याने याविषयी खात्रीशिर माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी ठाकरे गटातील समर्थकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Shivsena , Dombiwali Latest News
Kishori Pednekar On Navneet Rana | किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर जहरी टीका

दरम्यान, ताबा हा आमचा पहिल्यापासून आहे, आम्ही येथे पक्षाचे काम करत होतो. वर्षानुवर्षे येथे काम सुरु आहे. आता फक्त कायदेशीर रित्या ही शाखा आमच्या ताब्यात आली आहे. त्याचा रितसर व्यवहार करण्यात आला आहे. वर्धमान कंपनीचे मालक यांच्याशी करारनामा झाला असून तो सेल करारनामा केला असून आज आम्ही ते ताब्यात घेतले. काही हितचिंतक सांगत होते की शाखा आमची आहे, त्यामुळे बेकायदेशीर असण्यापेक्षा कायदेशीर असलेले कधीही चांगले. शाखा आपले मंदिर आहे, येथे कोणीही कामासाठी येऊ शकते, परंतू ही बाळासाहेबांची शिवसेना शाखा आहे. हे निश्चित, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com