बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने संपली; नितेश राणेंचा घणाघात

गेल्या दोन आठवड्यांपुर्वी उत्तर त्रिपुरात (Tripura) विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu parishad) रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोडीची घटना घडली
बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने संपली; नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने संपली आहे. तुमच्या वडिलांचा ज्यांनी विरोध केला त्यांना तुम्ही मांडीवर का बसवता हेच का तुमचे पुत्र प्रेम, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टिकास्त्र डागले आहे.

त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांपुर्वी मोठा हिंसाचार घडला. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. भाजप, आरएसएस आणि विश्वहिंदु परिषदेवर दंगल घडवण्याचे आरोप होत आहेत. अखिलेश यादव आणि राहुल गांधी भडकावू ट्विट करत आहेत त्यांच्यावर का कुणी कारवाई करत नाही, असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने संपली; नितेश राणेंचा घणाघात
न्यायालय देईल तो निर्णय मान्य असेल : अनिल परब

रझा अकदामी छोट्या यु ट्यूब चॅनलवर छोटे व्हिडिओ प्रसिद्ध करत भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटवर देखील ट्रेंड सुरु केले आहेत, जळगावमध्ये जे युट्युब चॅनल आहेत तिथे देखील खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, रझा अकादमीने 30 ऑक्टोबरला पहिली मिटिंग घेतली. 2 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना पत्र पाठवले. मग राज्य सरकारने राज्यातील कायदा आणि सुवस्था खराब करू नका, असे का नाही सांगितले. मला तर हे महाविकास आघाडीचे षडयंत्र दिसत आहे, असा थेट आरोपच नितेश राणे यांनी केला आहे.

- काय आहे प्रकरण ?

गेल्या दोन आठवड्यांपुर्वी उत्तर त्रिपुरात विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोडीची घटना घडली. त्यानंतर त्रिपुरातील सर्व मशिदींचा सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती तेथील पोलीस महासंचालक व्हीएस यादव यांनी दिली. तसेच, तुरळक घटना वगळता उत्तर त्रिपुरामध्ये परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे सांगितले होते.

पण त्रिपुरामध्ये मशिदीत तोडफोड झाल्याची अफवा पसरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रात मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत या मोर्च्यााला हिंसक वळण लागलं. त्याच्या निषेधार्थ भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी अमरावती बंदची हाक दिली. त्या बंदला देखील हिंसक वळण लागलं. यामध्ये काही गाड्यांची. दुकांनांची तोडफोड करण्यात आली. जी दुकाने, कार्यालये बंद करण्यात आली. जय श्रीरामच्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com