पुनम पांडेच्या तक्रारीनंतर पती सॅम अहमद बॉंम्बेला अटक

दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पूनम पांडेने गेल्या वर्षी बॉयफ्रेंड सॅम अहमद बॉम्बेसोबत लग्न केले.
पुनम पांडेच्या तक्रारीनंतर पती सॅम अहमद बॉंम्बेला अटक
Published on
Updated on

बॉलीवूड अभिनेत्री पुनम पांडे (Punam Pandey) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनमने आपला पती सॅम अहमद बाँम्बे (Sam Ahmed Bombay) याच्या विरोधात वांद्रे पोलिस (Wandre Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. पुनम सॅमची पहिली पत्नी अली अहमद हिच्याशी बोलत असल्याचा राग मनात धरून सॅमने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पुनम पांडेने केला आहे.

सॅमने केसाला धरून तिचे डोके भिंतीवर आपटले. तसेच तोंडावर ठोसा मारल्याने डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याने कमी दिसू लागल्याची तक्रार पुनमने पोलिसात केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी सॅम बाँम्बे याला अटक केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुनम पांडेच्या तक्रारीनंतर पती सॅम अहमद बॉंम्बेला अटक
त्या साऱ्यांना ‘उत्सवमूर्तीं‘चे एकाच शब्दांत उत्तर - धन्यवाद

दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या पूनम पांडेने गेल्या वर्षी बॉयफ्रेंड सॅम अहमद बॉम्बेसोबत लग्न केले. सोशल मीडियाद्वारे तिने आपल्या चाहत्यांना याची दिली. कोविडमधील हे लग्न लो प्रोफाइल होते. यानंतर दोघेही हनिमूनसाठी गोव्याला रवाना गेले, मात्र तेव्हाही पूनमने पतीवर शोषण आणि मारहाणीचा आरोप केल्याची माहिती समोर आली होती. पूनमच्या तक्रारीनंतर सॅम बॉम्बेला गोवा पोलीसांनी अटक केली होती. मात्र नंतर त्याला जामीन देण्यात आला. या घटनेनंतर पूनमनेही सॅमसोबतचे आपले नाते संपवत असल्याचे म्हटले होते.

२७ जानेवारी १९८४रोजी सॅमचा जन्म मुंबईत झाला. त्याने दबईत आपले शिक्षण पूर्ण केले.पूनम पांडेसॅमची दुसरी पत्नी आहे. पूनमच्या आधी त्याने मॉडेल अली अहमद यांच्याशी लग्न केले होते. सॅम आणि अली यांना ट्रॉय बॉम्बे आणि टीया बॉम्बे नावाची दोन मुलेही आहेत. सॅम बॉम्बे चित्रपट निर्माता आहे. दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया, टायगर श्रॉफ, दिशा पटानी यांसारख्या कलाकांरांसोबत काम केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com