Ganpat Gaikwad
Ganpat GaikwadSarkarnama

Maharashtra MLC Elections : गोळीबार फेम भाजप आमदाराला मतदान पासून रोखा; विरोधकांचा निवडणूक आयोगावर संताप!

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणी काँग्रेसच्या उमेदवाराने केली आहे. तसेच विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील ही मागणी लावून धरली आहे.
Published on

Mumbai News : गोळीबार प्रकरणी सध्या कारागृहात असलेले आमदार गणपत गायकवाड यांना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करू देऊ नये, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत आमदार गायकवाड मतदान करण्यासाठी विधान परिषदेसाठी आले.

यावर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ता कुठे कुठे पोचते हे सर्वजण बघत आहेत. 'एकाला न्याय एक आणि दुसऱ्याला एक का?' अशी विचारणा देशमुख यांनी केली आहे. ही सत्ताधाऱ्यांची कूटनीती आहे, असेही देशमुख म्हणाले.

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात सध्या जेलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करून देऊ नये, अशी मागणी काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. विरोधकांनी देखील ही मागणी लावून धरली असून विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे घरघडी म्हणून काम करत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली. माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी देखील स्वतःच्या गुन्ह्याचा दाखला देत गणपत गायकवाड यांच्या मतदानाला विरोध केला आहे.

Ganpat Gaikwad
Maharashtra MLC Elections : विधान परिषदेसाठी दुपारी बारापर्यंत 160 आमदारांनी केले मतदान; सर्वाधिक मतदान भाजपचे

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, सत्ता कुठे कुठे पोचते हे सर्वजण बघत आहेत. एकाला न्याय एक आणि दुसऱ्याला एक अशी सत्ताधाऱ्यांची कूटनीती आहे. आमदार अनिल देशमुख यांच्यावर फक्त आरोप होते. परंतु गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचे सर्व दुनियांनी बघितले आहे. अनिल देशमुख यांना मतदानाला येऊ दिले नव्हते. आणि आता गणपत गायकवाड यांना मतदानाला येऊ दिल्याने निवडणूक आयोग कोणाच्या छत्रछायेखाली काम करत आहे. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग हे घरगडी सारखे काम करत आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. माझ्यावर आरोप होते. त्यावेळेस मला सत्ताधाऱ्यांनी तुरुंगात टाकले. मला निवडणुकीच्या मतदानासाठी येऊन दिले नाही. न्यायालयाने (Court) देखील माझे मतदान करण्यासाठी केलेला अर्ज फेटाळले. मग भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत वेगळा न्याय का? असा प्रश्न आणि देशमुख यांनी उपस्थित केला.

Ganpat Gaikwad
Video MLC Elections: जेलमधून मतदानासाठी बाहेर येणाऱ्या भाजप आमदाराला काँग्रेस रोखणार? देशमुख, मलिकांना वेगळा न्याय का?

क्रॉस वोटिंग रोलिंग पार्टी सोबत होणार : वडेट्टीवार

काही वाहिन्यांनी फेक नरेटिव्ह दाखवले. हे कोठून आले. याची चौकशी व्हावी. आमचे सर्व मतदार आणि उमेदवार आम्हाला हलवण्याची सुद्धा वेळ आली नाही. ज्यांना भीती होती, त्यांनी हॉटेलमध्ये त्यांना पळवलं, अशी टीका काँग्रेस नेते विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केली. आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते. यामध्ये तिन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील. त्यामध्ये कुठेही गडबड नाही. अंतापुरकरचे दोन आमदार सोडले, तर सगळे 35 आमदार सोबत होते. क्रॉस वोटिंग झाले, तर रोलिंग पार्टी सोबत होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com