Video MLC Elections: जेलमधून मतदानासाठी बाहेर येणाऱ्या भाजप आमदाराला काँग्रेस रोखणार? देशमुख, मलिकांना वेगळा न्याय का?

Maharashtra MLC Elections 2024 mla ganpat gaikwad come out taloja jail for voting: अनिल देशमुख, नवाब मलिक त्यांनीही मतदानासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण तो नामंजूर झाला. गायकवाड यांचा अर्ज न्यायालयाने कसा मंजूर केला, असा संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Vidhan Parishad Election 2024
Vidhan Parishad Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणारे भाजप आमदार तळोजा जेलमधून विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) मतदानासाठी येणार आहेत, पण त्यांना मतदान करायला देऊ नये, असे पत्र काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांनी लिहिले आहे.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदार गणपत गायकवाड हे मतदान करु शकत नाही, असे काँग्रेसने पत्रात म्हटलं आहे. गायकवाड यांच्या मतदानाबाबत निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेसाठी सुमारे 24 वर्षांनंतर 10 जून 2022 ला प्रथमच निवडणूक झाली. त्यावेळी आमदार अनिल देशमुख, आमदार नवाब मलिक हे कारागृहात होते. त्यांनीही मतदानासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला होता. पण आता गायकवाड यांचा अर्ज न्यायालयाने कसा मंजूर केला, असा रोखठोक सवाल ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Vidhan Parishad Election 2024
MLC Election: कडेकोट पोलिस बंदोबस्तात एक आमदार मतदानासाठी येणार

गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)सध्या तळोजा जेलमध्ये आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज त्यांनी न्यायालयाकडे केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला आहे. ते पोलिस बंदोबस्तात विधीमंडळात पोहचणार असल्याची माहिती आहे.

गणपत गायकवाड कुणाला मतदान करणार, याची उत्सुकता सगळ्याला लागली असताना काँग्रेसने गायकवाड यांच्या मतदानाला विरोध केला आहे. काँग्रेसच्या पत्राची निवडणूक आयोग दखल घेणार का? निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, हे लवकरच समजेल.

काही महिन्यांपूर्वी कल्याण पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या प्रकरणात भाजप आमदारासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या त्यांचा मुक्काम जेलमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com