Jain community Mumbai: निवडणुकीपूर्वी नाराज जैन समाज पुन्हा हसणार; 4 ठिकाणच्या कबुतरखान्यांना मुंबई महापालिकेचे खाद्य

Mumbai civic body news : चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदच राहतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले.
Jain Community Protest Dadar Kabutarkhana BMC Pigeon Ban:
Jain Community Protest Dadar Kabutarkhana BMC Pigeon Ban:Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कबुतरखाने बंद केल्यानंतर मुंबईतील जैन समाज नाराज झाला होता. याच नाराजीनंतर जैन समाजाने स्वतःचा राजकीय पक्षही स्थापन केला होता. याचा परिणार थेट आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता होती. पण आता निवडणुकीपूर्वीच मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरु होणार आहेत. महापालिकेने चार ठिकाणी नियंत्रीतरित्या कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेला जैन समाज पुन्हा हसणार आहे.

'या' चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी दिली परवानगी

वरळी जलाशय (वरळी रिझव्र्हयर), अंधेरी येथील खारफुटी परिसर, मुलुंड पूर्वेतील खाडी परिसर आणि गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदच राहतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले. या चारही ठिकाणी कबुतरांना नियंत्रितरीत्या खाद्य टाकण्यास परवानगी असणार आहे.

Jain Community Protest Dadar Kabutarkhana BMC Pigeon Ban:
BJP setback: भाजपला धक्का! शिंदे, अजितदादांच्या मंत्र्यांचे सूर बदलले, विरोधकांच्या मतचोरीविरोधाला बळ मिळणार?

स्वयंसेवी संस्थेकडून घेतले जाणार प्रतिज्ञापत्र देखील

महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या कालावधीतच कबुतरांना दाणे पुरवता येणार आहेत. महापालिके निर्देशांनुसार 'कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होऊ नये, कबुतरखान्याच्या दिलेल्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणे, या सर्व बाबींची दक्षता संबंधित स्वयंसेवी संस्थेला घ्यावी लागेल. त्या अनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे.

Jain Community Protest Dadar Kabutarkhana BMC Pigeon Ban:
Uddhav Thackeray: अमित शाहंना पुन्हा अ‍ॅनाकोंडाची उपमा; शोलेतील डायलॉग सांगत उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा

आरोग्याविषयी जनजागृतीकरिता फलकही लावणार

कबुतरखान्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त हे समन्वय अधिकारी असतील. या कबुतरखान्यांच्या परिसरात आरोग्याविषयी जनजागृतीकरिता फलकही लावण्यात येतील. मुंबईतील सध्याचे कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कबुतरखान्यांबाबत, नागरिकांच्या हरकती सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

Jain Community Protest Dadar Kabutarkhana BMC Pigeon Ban:
Raj Thackeray : राज ठाकरेंनी दादरमधून 10.41 ची लोकल पकडली, तुफान गर्दीतही मिळवली विंडो सीट; इतर नेत्यांचं काय झालं?

नऊ हजार 779 सूचना व हरकती

कबुतरखान्यांबाबत नागरिकांकडून महापालिकेकडे एकूण नऊ हजार 779 सूचना व हरकती, तक्रारी आदी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाना बंद करणे, सुरू ठेवणे, स्वच्छता राखणे, नियंत्रित पद्धतीने दाणे पुरवणे, अशा सर्व पैलूंचा समावेश आहे. कबुतरखान्यांबाबत तज्ज्ञ समितीचा अहवाल व न्यायालयाचे आदेश येईपर्यंत, अंतरिम कार्यवाही म्हणून महापालिकेने या नवीन चार जागांना परवानगी दिली आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.

Jain Community Protest Dadar Kabutarkhana BMC Pigeon Ban:
BJP setback: भाजपला धक्का! शिंदे, अजितदादांच्या मंत्र्यांचे सूर बदलले, विरोधकांच्या मतचोरीविरोधाला बळ मिळणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com