BEST Election: "आम्ही नाही हो, तुम्हीच हारलात" बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानं भाजपच हरली; अंधारेंचा दावा

Sushma Andhare on BEST Election Result: बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इलेक्शनमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी संयुक्त पॅनेलद्वारे निवडणूक लढवली, यात त्यांचा दारुण पराभव झाला.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

BEST Election: बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधले होते. कारण या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा मोठा पराभव झाला.

यावरुन भाजपनं ठाकरे बंधुंना टार्गेट करत ठाकरे ब्रँड अपयशी ठरल्याचं म्हटलं होतं. पण आता ठाकरेंच्या मदतीला त्यांच्या उपनेत्या सुषमा आंधारे आल्या आहेत. आमचा नाहीतर तुमचाच पराभव झाला असं सांगताना ही निवडणूक मतपत्रिकांवर झाल्यानं भाजपचा यात पराभव झाला असा दावा त्यांनी केला आहे.

Sushma Andhare
Best Society Election Result: BEST सोसायटीत ठाकरे बंधूंचा पराभव का झाला? छगन भुजबळ यांनी केले अचुक विश्लेषण...

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्यावतीनं पहिल्यांदाच या निवडणुकीवर भूमिका मांडली. अंधारे म्हणाल्या, "ही कुठल्याही निवडणुकीची रंगीत तालीम नव्हती, ही बातमी माध्यमांची आहे. माध्यमाने याला सेमी फायनल वगैरे म्हणायला सुरुवात केली आहे. ९ वर्षाच्या सत्तेनंतर या निवडणुकीत बदल झाला आहे.त्यामुळे लोकांना कूस बदलावीशी वाटली असेल. मात्र, दुसऱ्या अंगाने पाहिलं तर भाजपची दिल्लीपासून सगळीकडे सत्ता आहे, तरीही भाजप बेस्ट निवडणुकीत हारलं आहे.

बेस्ट निवडणुकीत भाजपा सपशेल तोंडघशी पडली आहे. पराभव त्यांचा देखील झाला आहे. बॅलेट पेपरवर जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्या त्यावेळी भाजप हारली आहे. कालच्या निवडणुकीत भाजपा अपयशी ठरली आहे. शशांक राव यांच्या आघाडीला जिंकल्यानंतर ते आपलेच आहेत, असं भाजप म्हणत दुसऱ्याची पोर अंग खांद्यावर खेळवली म्हणजे ती भाजप आपलीच पोरं म्हणत आहे. महानगरपालिका निवडणुका अजून लांब आहेत. एखाद्या पराभवानंतर भूमिका बदलाव्यात ठाकरे इतके तकलादू नाहीत. ठाकरे ज्या भूमिका घेतात म्हणजे कणखरपणे घेतात. ठाकरेंचा हाच कणखर बाणा भविष्यात कायम राहील असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे"

Sushma Andhare
Raigad Boat Capsize: करंजा गावाजवळ समुद्रात बोट बुडाली; लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल

दरम्यान, बेस्टच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची झालेल्या भेटीवरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या. "दोघांची भेट ही सहज आणि स्वाभाविक गोष्ट आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे कोणतेही नेते मुख्यमंत्र्यांना कधीही भेटू शकतात, याचे वेगळी अर्थ लावायचे काही कारण नाही. त्यापेक्षा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. मुंबईची अवस्था बिकट झाली आहे.

Sushma Andhare
BJP Symbol History : भाजपच्या डोक्यात 'कमळ' नव्हतेच..., सुरुवातीची 3 चिन्हं कोणती होती?

बेस्टच्या विषयाबद्दल बोलणाऱ्यांनी बेस्ट काल पाण्यात बुडवून दाखवली आहे. विमानतळावर इतकं पाणी साठलं होतं की त्या ठिकाणी बोटी चालवाव्यात का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नगरविकास खात्याला शालजोडातून मारून राज्यात कुंपणच शेत खात आहे, अशी आपल्या राज्याची अवस्था झाली असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला करून दिली," असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com