Raj Thackeray News : बेस्ट पतपेढीतील पराभवानंतर राज ठाकरेंची आश्चर्यकारक प्रतिक्रिया; म्हणाले, हा विषयच...

BEST Society Election Results 2025 : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या यूनियनने 21 पैकी 14 जागांवर विजय मिळवत ठाकरेंना धक्का दिला आहे.
MNS Raj Thackeray News
MNS Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट व मनसेच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला असून 21 पैकी एकही जागा मिळाली नाही.

  2. कामगार नेते शशांक राव यांच्या यूनियनने 14 जागा जिंकल्या, तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलला 7 जागा मिळाल्या.

  3. राज ठाकरे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना हा विषयच माहित नसल्याचे सांगितले, तर भाजपने याला ठाकरे ब्रँड नाकारल्याचे प्रतीक मानून टोले लगावले.

Raj Thackeray’s Reaction After Defeat : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. या पॅनेलला 21 पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यावरून भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही ठाकरे ब्रँड चालणार नसल्याचे सांगत ठाकरे बंधूंना डिवचले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरूवारी या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पतेपढीच्या निकालावरील राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आश्चर्यकारक अशीच होते. त्यांना या निवडणुकीबद्दल काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या निकालाविषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हा विषयच आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे बेस्टच्या निवडणुकीत झालेली शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेची युती स्थानिक नेत्यांनी परस्पर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील वाहतुकीच्या आरखड्याबाबत ही भेट झाल्याचे ठाकरेंनी त्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. याचदरम्यान पत्रकारांनी त्यांना पतपेढीचा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, हा विषयच मला माहिती नाही. या निवडणुका स्थानिक निवडणुका आहेत. पतपेढी वगैरे असंच काहीतरी ना. या छोट्या गोष्टी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

MNS Raj Thackeray News
Top 10 News : आणखी एक राजकीय घराणे फुटले... राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट... भाजप-राष्ट्रवादीच्या संघर्षाचा ट्रेलर; वाचा महत्वाच्या घडामोडी

दरम्यान, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या यूनियनने 21 पैकी 14 जागांवर विजय मिळवत ठाकरेंना धक्का दिला आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलला सात जागा मिळाल्या आहेत. ठाकरेंच्या पॅनेलच्या पराभवानंतर भाजपकडून मुंबईत जोरदार फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. त्यामुळे पतपेढीची निवडणूक म्हणजे रंगीत तालीम असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाशी संलग्न संघटनांनी एकत्रित येत ही निवडणूक लढविल्याने त्याला महत्व प्राप्त झाले होते.

MNS Raj Thackeray News
Amit Shah News : अमित शहांनी अटक होण्यापूर्वी खरंच दिला नव्हता का राजीनामा? किती महिने होते जेलमध्ये?

उद्धव ठाकरेंच्या संघटनेने 19 तर राज ठाकरेंच्या संघटनेचे 2 उमेदवार रिंगणात होते. पण त्यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. बेस्टमध्ये बहुतेक कामगार हे मराठी आहेत. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधुंना मराठी माणसांनी नाकारल्याची टीका भाजपकडून केली जात आहे.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत कोणत्या पॅनेलला विजय मिळाला?
A: शशांक राव यांच्या यूनियनने 14 जागांवर विजय मिळवला.

Q2: ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव कसा झाला?
A: 21 पैकी एकही जागा न जिंकल्यामुळे त्यांना पूर्ण पराभव पत्करावा लागला.

Q3: राज ठाकरे यांनी निकालावर काय प्रतिक्रिया दिली?
A: त्यांनी हा विषयच माहिती नसल्याचे सांगत प्रतिक्रिया टाळली.

Q4: भाजपने यावर काय टीका केली?
A: भाजपने ठाकरे ब्रँड मुंबईत चालणार नाही, असे म्हणत टोले लगावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com