पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करण्यामागे भंडारींनी सांगितले कारण

BJP| Madhav Bhandari| महाराष्ट्राने राज्यांतर्गत कर कमी केल्यास पेट्रोल डिझेलचे भाव किमान दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतात.
 BJP| Madhav Bhandari|
BJP| Madhav Bhandari|
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्यासाठी आवाहन केले. मात्र राज्यातील ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देऊन सामान्य जनतेची लूट करीत आहे, अशी घणाघाती टिका भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केली आहे.

गुरुवारी (२८ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्यासाठी आवाहन केले, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटीचा मुद्दा पुढे केला. आज महाराष्ट्रात पेट्रोल वर ३२ रु. १५ पैसे इतका व्हॅट आकारला जातो. पेट्रोल - डिझेल वरील उत्पादन शुल्कात केंद्र सरकारने कपात केल्यानंतर लगेच देशभरातील भाजपशासित राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातील पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट कमी केला.

 BJP| Madhav Bhandari|
महानिर्मीतीकडे स्वमालकीची खाण असून ऊर्जामंत्र्यांनी राज्याला काळोखात लोटले !

परंतू, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तेलंगणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांनी अद्यापही पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कमी केला नाही. दारूवरील कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारने पंतप्रधानांचे आवाहन झुगारून राजकारण सुरूच ठेवले, पण त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. गेल्या सहा महिन्यांत या करांपोटी राज्य सरकारने तब्बल साडेतीन हजार कोटींचा महसूल कमावला असल्याचे यावेळी माधव भंडारी यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांच्या खिशात हात घालून केलेल्या या कमाईबद्दल जनतेची माफी मागण्याऐवजी, जीएसटीचा पूर्ण परतावा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवरील राज्याकडून आकारला जाणारा भरमसाठ दर कमी करणार आहे का? महाराष्ट्राने राज्यांतर्गत कर कमी केल्यास पेट्रोल डिझेलचे भाव किमान दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतात. पण ठाकरे सरकारची ती इच्छा नाही, अशी टिकाही भंडारी यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातून जमा होणारा वस्तू व सेवा कराचा परतावा राज्याला सातत्याने व नियमितपणे मिळत आहे. ही रक्कम केंद्राकडून महाराष्ट्रास मिळण्यासाठी जुलै २०२२ पर्यंतची मुदत आहे. मुळात ही रक्कमदेखील २६ हजार कोटी एवढी नाही. २६ हजार कोटींपैकी १३ हजार ७८२ कोटींचा परतावा राज्य सरकारला आधीच मिळाला आहे. उर्वरित १३ हजार ६२७ कोटी जुलैपर्यंत दिले जातील. असेही यावेळी माधव भंडारी यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com