Maharashtra Politics : तीन आठवडे तुफान राडा, शेवटच्या आठवड्यात सत्ताधारी- विरोधकांचे जुळले सूर; 'हा' मुद्दा ठरला कारण

Bharat Ratna for Jyotirao Phule, Savitribai | मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या ठरावाला पाठिंबा दिला.
Mahatma Phule, Savitribai Phule
Mahatma Phule, Savitribai PhuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government News : समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव सोमवारी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या ठरावाला पाठिंबा दिला.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फुले यांना देण्यात आलेली महात्मा पदवी लोकांनी ओळखली आहे. "महात्मा पदवी देशातील सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ होती आणि ती फक्त दोनच लोकांना मिळाली - महात्मा फुले आणि महात्मा गांधी," असे ते म्हणाले.

Mahatma Phule, Savitribai Phule
Eknath Shinde Shiv Sena : कोरटकर अन् सोलापूरकरांच्या घरावर कुणी हल्ला केला नाही! अनिल परबांची महायुतीला 'गुगली' (VIDEO)

हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधीमंडळ सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आभार मानले. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार म्हणाले, फुले दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करून, स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करुन दिली. आज विविध क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत. देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना जाते.

Mahatma Phule, Savitribai Phule
Jayant Patil News : हजामती करत होता का… त्याने झक मारल्यावर संरक्षण का दिले? जयंत पाटील विधानसभेत संतापले

अधिवेशनात विविध मुद्यांवरुन सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. पण, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांना भारतरत्न देण्याच्या ठरावाला विरोधक व सरकारमधील आमदारांनी एकमताने ठराव मंजूर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com