मुंबई : महाआघाडीच्या सर्व मंत्र्यानी आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. कारण केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. तसेच, यामध्ये केवळ मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे. धक्कादायक म्हणजे होऊ घातलेल्या धाडी आणि त्यांच्या तारखा भाजप नेते (BJP leader) आधी सांगतात आणि त्यानंतर कारवाई होते. त्यामुळे याचा अर्थ असा की यंत्रणा भाजपसाठी काम करत आहेत? असा आरोप शिवसेना (Shiv sena ) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय तपास यंत्रणा व भाजपवर केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले, आता नांदेडला पोटनिवडणूक लागली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात. २०१४ पूर्वीची भाजपची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की भाजप नेते डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येक वेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता म्हणायची वेळ आली आहे की, 'कुठे नेवून ठेवला भारत माझा' असा वाढत्या महागाईवरून भाजपला त्यांनी टोला लगावला आहे.
याबरोबरच जाधव यांनी दरेकरांवर जोरदार टीका केली ते म्हणाले, राज्यात कुठलीही घटना घडली तरी, प्रवीण दरेकर स्टुडिओ मध्ये बसलेले दिसतात. याचा अर्थ असा होतो की, एकतर ते स्टुडिओ मध्ये जाऊन बसलेले असतात किंवा मीडियाचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवीण दरेकर उपलब्ध होतात. असा चिमटा देखील त्यांनी काढला. नुकतीच कांचनगिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि राज ठाकरे यांची स्तुती केली होती. याबाबत जाधव यांना विचारले असता, कांचनगिरी कोण आहेत हे मला माहिती नाही. ते कशाच्या आधारावर बोलले याबद्दल मला माहिती नाही असे बोलत त्यांनी यावर बोलणे टाळले.
रामदास आठवले यांनी आयकर विभागाच्या धाडीने अजित पवार यांना कोणताही फरक पडणार नाही. या केलेल्या वक्तव्यावर जाधव म्हणाले, निदान भाजप त्यांच्या घटक पक्षातील एका मोठ्या नेत्यांचे तरी नक्की ऐकतील असा टोला त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.