Bhaskar Jadhav : संजय राऊतांविरोधात सभागृह एकवटले असताना, भास्कर जाधवांनी लढवला एकाकी किल्ला!

Bhaskar Jadhav : विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्यांचं काय?
Bhaskar Jadhav : Sanjay Raut
Bhaskar Jadhav : Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना, शिंदे गटाला उद्देशून 'हे विधामंडळ नसून, चोरमंडळ आहे,' अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. आज विधिमंडळात राऊतांच्या या वक्तव्याने एकच गदारोळ उठले. राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधारी आमदारांनी सपाटा लावला, या गदारोळामुळेच आजचे कामकाज तहकूब करावे लागले.

सत्ताधारी आमदारांच्या या प्रयत्नाला विरोधीपक्षनेते अजित पवार यांची एकप्रकारे साथ मिळताना दिसून आली "कोणत्याही पक्षाचा सदस्य असला तरी, विधीमंडळाचा कोणी अपमान करत असेल तर त्याला सूट मिळता कामा नये. त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी ताठर भूमिका अजित पवार घेतली. यामुळे ठाकरे गटाचे आमदारांची निराशा झाल्याची चर्चा आहे.

Bhaskar Jadhav : Sanjay Raut
Maharashtra Assembly News: ठाकरे गटाचे जशास तसे उत्तर : थेट मुख्यमंत्री शिंदेंवरच हक्कभंग आणण्याची तयारी!

यानंतर मात्र आपल्या नेहमीच्या आक्रमक भाषाशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांनी मात्र राऊत यांची बाजू धरून लावत, बचावाचा जोरदार किल्ला लढवला. यामुळे विधीमंडळात जाधव आणि इतर सगळे असा सामना पाहायला मिळाला.

जाधव यांनी मागील काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सातत्याने करत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक चकमक उडाली होती. यालगोलग भाजप नेते मोहित कंबोज यांनी व्हिडीओ जाहीर करत जाधवांवर आऱोप केले होते. 'जाधव हे शिंदे गटात येण्यासाठी शंभर वेळा फोन करत होते,' असा दावा कंबोज यांनी केला. यामुळे जाधव चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

Bhaskar Jadhav : Sanjay Raut
Raosaheb Danve Viral Video : ए हसणारा, बिडी प्यायला आला का? दानवेंनी कार्यकर्त्यास भरसभेत झापलं

सभागृहाबाहेरच्या व्यक्ति संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्ष इतका कांगावा करत आहे, पण सभागृहाचा सर्वोच्च नेत्याने विरोधी पक्षांना, त्यांच्या सदस्यांना देशद्रोही असे संबोधले होते, तेव्हा ते का गप्प होते? असा मुद्दा जाधव यांनी मांडला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचीच री ओढतराऊतांविरोधात हक्कभंग होत नाही, असा दावा केला. यामुळे राऊतांचा ढासळणारा बुरूज सावरत, जाधवांनी एकाकी किल्ला लढवला. यामुळे आज ते चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com