Amit Shah In Pune : पंतप्रधान मोदींनंतर पाच दिवसांत केंद्रीय गृहमंत्री शहा पुण्यात; भाजपला लागले निवडणुकीचे वेध

Bjp Pune News : अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आले आहेत.
Amit Shah News
Amit Shah NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची धूळ खाली बसते न बसते तोच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे शनिवारी (ता. ५) पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यातून भाजपला निवडणुकीचे वेध लागले असल्याची व तिच्या तयारीसाठी हे दौरे होत असल्याची चर्चा ऐकायला मिळाली आहे.

पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण यासाठी मोदी नुकतेच (ता.१) पुणे दौऱ्यावर येऊन गेले. त्यासाठी प्रोटोकॉलनुसार राज्यपाल रमेश बैस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या दौऱ्याची धूळ खाली बसते नाही तोच अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे पुन्हा पुण्यात आले आहेत.

Amit Shah News
Pcmc News : भाजपकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा समारोप की निवडणूक प्रचाराची सुरवात?

लोकसभेची निवडणूक नऊ महिन्यांवर आली आहे. केंद्रात पुन्हा सत्तेत येण्याची आणि मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान करण्याची हॅटट्रिक भाजपला करायची आहे. त्यासाठी त्यांचे कसोशीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गेल्यावर्षी शिवसेना फोडली. तर, यावर्षी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीत बंड घडवून आणत अजित पवारांना राज्यातील आपल्या सत्तेत सामील करून घेतले. त्यातून त्यांनी राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे.

मात्र, दुसरीकडे देशातील सर्व विरोधी पक्ष 'इंडिया' या आघाडीखाली एकवटल्याने आगामी लोकसभेची निवडणूक भाजपने (BJP) अधिक गांभीर्याने घेण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोदींच्या महाराष्ट्रातील पुणे (Pune) दौरा झाला. तर, त्यानंतर या तयारीत कसलीच कसर राहू नये म्हणून शहा हे ही महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. तेथे शिंदे-फडणवीस-पवार या त्रयीची पुन्हा उपस्थिती आहेच.

Amit Shah News
Sujay Vikhe Patil News : लव्ह जिहादवरुन सुजय विखे आक्रमक; संसदेत भूमिका मांडणार

दरम्यान, पुण्यातील बुथ कमिटी प्रमुखांची पूर्वनियोजित बैठक शहा यांनी रद्द केल्याचे समजते. मात्र, चिंचवडमधील त्यांचा त्यांच्या सहकार खात्याचा कार्यक्रम हा होणार आहे. दुपारी बारा वाजता तेथे केंद्रीय सहकार विभागाच्या 'सहकार से समृद्धी' या पोर्टलचे उद्घाटन शहा करणार आहेत. तो आटोपून सायंकाळी ते लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत.

त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी शासनाने, तर बंदोबस्ताची पोलिसांनी सुरु केली आहे. त्यांनी चिंचवडमधील शहांच्या दुपारच्या कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेत सकाळी आठपासून बदल करीत काही रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार असून त्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत हा फटका बसणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com