Kapil Patil Vs Suresh Mhatre: बाळ्यामामा की कपिल पाटील; भूमिपुत्र कुणाला लोकसभेत पाठवणार?

Bhiwandi Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीनेही हेच आगरी कार्ड आता खेळले असून, सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही आगरी मते आता विभागली जाणार आहेत. शिवसेनेत फूट पडली असून, शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी असले, तरी ठाकरे गटाचा पगडा अधिक आहे.
Suresh Mhatre News
Suresh Mhatre NewsSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi News: भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी (mahavikas aghadi) आणि महायुती (mahayuti) यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र, अपक्ष उमेदवाराने एन्ट्री केल्याने ही निवडणूक आता तिरंगी होत आहे. महाविकास आघाडीने कपिल पाटील (Kapil Patil) यांना, तर महायुतीने सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी (Kapil Patil Vs Suresh Mhatre) दिली आहे. जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहे.

भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत विद्यमान खासदारांना मताधिक्य वाढले होते. हे वाढलेले मताधिक्य टिकवून ठेवणे, आव्हान ठरणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट, सेना आणि भाजपमधील अंतर्गत नाराजी, भूमिपुत्रांचा कौल यावर येथील मतदार आता लोकसभेत कोणाला संधी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या लोकसभेतील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, तर भूमिपुत्रांचा टक्का जास्त असून, त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत.

पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली असून मनसेच्या मतांची विभागणी कशी होते, हे पाहावे लागेल. तर सुरेश म्हात्रे यांना प्रथम काँग्रेसची नाराजी दूर करावी लागेल, त्याचप्रमाणे समाजवादी पक्ष आणि एमआयएम यांना जवळ करावे लागेल. सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांनी राजकारणात एन्ट्री केली असून वंचितने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कुणबी समाजाची मतेही विभागली जाणार आहेत. सध्या तरी चुरशीची तिरंगी लढत असून, पाटलांना विजय तितका या वेळी सोपा नाही.

महाविकास आघाडीनेही हेच आगरी कार्ड आता खेळले असून, सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही आगरी मते आता विभागली जाणार आहेत. शिवसेनेत फूट पडली असून, शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी असले, तरी ठाकरे गटाचा पगडा अधिक आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर म्हात्रे यांचे कडवे आव्हान असेल. ठाणे जिल्ह्यात भूमिपुत्रांचा शिवसेनेला नेहमीच पाठिंबा दिला आहे. भाजपने शिवसेनेचे हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी खासदार पाटील यांना केंद्रात मंत्रिपद देत ती मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

Suresh Mhatre News
Baramati Lok Sabha 2024: सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा 'या' शिलेदारांच्या खांद्यावर...

शिंदे गट व भाजपचे येथे सारखेच राजकीय बलाबल दिसून येते. जिल्हा परिषदेसह बहुतांश पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीही महायुतीच्या ताब्यात आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तेची गणिते, कल्याण लोकसभेला जोडून असलेला मतदारसंघ यावरून येथील सत्तांतर आत्तापर्यंत ठरत आल्याने विधानसभेवर सलग कोणाला विजय मिळवता आलेला नाही.

कोण आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आमदार

  • शहापूरमधून अजित पवार गटाचे दौलत दरोडा

  • मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे

  • भिवंडी पश्चिमेतून भाजपचे महेश चौघुले

  • भिवंडी पूर्व समाजवादी पक्षाचे रईस शेख

  • भिवंडी ग्रामीण मधून शिंदे गटाचे शांताराम मोरे

  • कल्याण पश्चिमेत शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com