Baramati Lok Sabha 2024: सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा 'या' शिलेदारांच्या खांद्यावर...

Baramati Lok Sabha Constituency 2024: सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. कोपरा सभा, गावभेटी यावर सुनेत्रा पवारांनी भर दिला आहे. त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी मंत्री विजय शिवतारेदेखील मैदानात उतरले आहेत.
Baramati Lok Sabha 2024
Baramati Lok Sabha 2024Sarkarnama

Pune News: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याशी होत आहे. पवार कुटुंबीयातील या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत प्रदीप गारटकर, वासुदेव काळे व किरण गुजर या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखांची नियुक्ती करणार आली आहे. बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर वेल्हा मुळशीमध्ये कुलदीप कोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार यांचा काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची घोषणाही करण्यात आली आहे.

Baramati Lok Sabha 2024
Harishchandra Chavan: पाच वर्षात आज माझी आठवण आली का? दिंडोरीत आजी-माजी खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोप

सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. कोपसा सभा, गावभेटी यावर सुनेत्रा पवारांनी भर दिला आहे. त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी मंत्री विजय शिवतारेदेखील मैदानात उतरले आहेत. त्यांनी नुकतीच सासवडमध्ये सभा आयोजित केली होती. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. तिघांनीही सुनेत्रा पवारांनाच मतदान करा, असं आवाहन केले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com