Suresh Mhatre Vs Kapil Patil : 'ठिकाण आणि वेळ तुम्ही ठरवा समोरासमोर..' सुरेश म्हात्रे यांचे कपिल पाटलांना खुले चॅलेंज!

Loksabha Election 2024 : यावर आता महायुतीचे उमेदवार कपिल पाटील काय उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.
Mhatre and  Kapil patil
Mhatre and Kapil patilSarakarnama
Published on
Updated on

Bhiwandi Lok Sabha Constituency News : भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोणगाव जिल्हा परिषद गटातून एक रुपयाचे काम झाले नाही, असे वक्तव्य येथील खासदार तथा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे यांनी त्यांना थेट चॅलेंज दिले आहे. बाहेरून बोलायचं सोडून द्या. वेळ, जागा आपण ठरवा, मी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी पोहोचेल. एकदा समोरासमोर बसूया होऊन जाऊ दे काय असेल तो सोक्षमोक्ष असे म्हात्रे यांनी आव्हान दिले आहे.

महाविकास आघाडीने अद्याप याठिकाणी आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी म्हात्रे यांनी थेट पाटलांना ललकारून निवडणूकीच्या रिंगणात भिडण्याचे आव्हान केले आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री तथा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून आपण विजयाची हॅटट्रिक करू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तर महाविकास आघाडीने अद्याप येथील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे तर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होण्याआधीच भाजपचे कपिल पाटील व राष्ट्रवादी पवार गटाचे म्हात्रे यांच्यात विकास कामांवरून शाब्दिक लढाई सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mhatre and  Kapil patil
Devendra Fadnavis : अविकसित मुंबईचे खापर; फडणवीस यांनी फोडले उध्दव ठाकरेंवर !

एका कार्यक्रमात महायुतीचे उमेदवार पाटील यांनी कोणगाव जिल्हा परिषदेतून एक रुपयाचे काम झाले नाही, असे वक्तव्य केले होते. यावरून थेट समोरासमोर येऊन भिडण्याचे आव्हान म्हात्रे यांनी पाटील यांना केले आहे. त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे.

म्हात्रे म्हणाले आहेत की, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी एक वक्तव्य केलं, कोण जिल्हा परिषद गटातून एक रुपयाच देखील काम झालं नाही. आणि झालं असेल तर ते माझ्या समोरासमोर बसायला तयार आहेत. मी कपिल पाटील यांना आव्हान करतो आपण देखील या कोण गटातून 2007 ला जिल्हा परिषदवर निवडून आले होते. 2012 पर्यंत या गटाचे आपण नेतृत्व केले. 2014 ला आपण खासदार म्हणून निवडून आलात. त्यानंतर दहा वर्षात आपण काय केलं याचा उहापोह मी नंतर करेल. पण आपण मला आव्हान केलेल म्हणून मी सांगतो की आपण गेल्या आठ दहा वर्षात इथे जे करू शकले नाही. मी 2018 जानेवारीला सभापती झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोणगावची पाण्याची प्रमुख समस्या होती. त्या समस्येचे निराकरण करण्यासाठ जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी 54 लाखाचे पाईपलाईनचे काम मंजूर करून घेतले.

याशिवाय, 'यात विशेष सांगतो कोणचा जो पाण्याचा प्रश्न होता तो असा होता अगोदर ही सरवली एमआयडीसी होती. सरवली एमआयडीसीचे कनेक्शन होते. त्या कनेक्शन नंतर कोण गावचा कनेक्शन होतं, आणि म्हणून ते पाणी कोण गावात प्रेशर मध्ये येत नव्हतं. त्या प्रकारे मी प्लॅनिंग करून एमआयडीसी सरवलीच्या पुढून कनेक्शन घेऊन तशाप्रकारे पाईप टाकून काम केलं.'

तसेच, 'ज्यावेळेस ते जोडणीचे काम आलं त्यावेळेस कपिल पाटील आपण स्वतः राजकीय स्वार्थापोटी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, फक्त आणि फक्त माझ्या विरोधासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एमआयडीसी अधिकाऱ्यांवर दबाव आणून हे पाईपलाईनची जोडणी करून दिली नाहीत. आजही मी आपल्याला आव्हान करतो मी ते बोलतो तसे पाण्याची पाईपलाईन जोडल्यानंतर जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे तेवढे पाणी मुबलक प्रमाणात कोण गावात मिळेल.' असंही म्हात्रे यांनी म्हटलं.

Mhatre and  Kapil patil
Thane Political News : एकेकाळच्या सहकाऱ्याचा आव्हाडांच्या निष्ठेवर सवाल; 'फुले-शाहू-आंबेडकरांप्रतीचा बनावट मुखवटा फाटला...'

'कपिल पाटील तुम्हाला आजही माझ चॅलेंज आहे. जर तुम्हाला खासदारकी कळली असेल तर खासदारांची काय कामं आहेत केंद्र सरकारकडून आपण काय काय योजना राबवल्या. एकदा आपण समोरासमोर बसू आणि मी आपणास आव्हान करतो आपण शंभर टक्के सपशेल अपयशी ठरलेले आहात. दहा वर्षांच्या कालावधीत आपण एकही बिल पास करू शकले नाही. आपण एकही रेल्वेची समस्या सोडवू शकले नाही. नॅशनल हायवेचे काम केलेले नाही. एकही असा प्रोजेक्ट ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल असा एकही प्रोजेक्ट या लोकसभेत आपण आणलेला नाही.

म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करतो. बाहेरून बोलायचं सोडून द्या. वेळ, जागा आपण ठरवा मी तिथे पोहोचेल. कधीही कुठेही असेल तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी पोहोचेल. एकदा समोरासमोर बसू या होऊन जाऊ दे काय असेल तो सोक्षमोक्ष.' असंही म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे. यावर आता युतीचे उमेदवार पाटील काय उत्तर देतात हे पहावे लागेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com