Bhiwandi Loksabha 2024 : कपिल पाटलांना पराभवाची धूळ चारण्यासाठी शरद पवारांना काढला हुकमी एक्का

Loksabha Election 2024 : भिवंडी लोकसभा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे राहिला आहे.मात्र सध्या भिवंडी लोकसभेत काँग्रेस पक्ष कमजोर असून या मतदारसंघात काँग्रेसकडे तगडा उमेदवारी देखील नव्हता. भिवंडी लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व नाही.
 Suresh Mhatre
Suresh MhatreSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Political News : भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यामध्ये रस्सीखेच होती. कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी तगडा उमेवार महाविकास आघाडीकडे नसल्याच्या चर्चा होत्या. पण डिसेंबर महिन्यात सुरेश म्हात्रे उर्फे बाळ्या मामा यांच्या मुलीच्या लग्न स्वागत समारंभाला शरद पवारांनी उपस्थिती लावली. त्यावेळी पवार आणि म्हात्रे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने लोकसभा निवडणुकीत भिवंडीचे (Bhiwandi Loksabha ) उमेदवार म्हणून म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे सामना होणार आहे.

भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार(Sharad Pawar) गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देत महायुतीचे कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे. म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख होते. शिंदे यांना धक्का देत म्हात्रे यांचा पक्ष प्रवेश करत शरद पवारांनी वेगळीच खेळी खेळत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणला आहे.

 Suresh Mhatre
Mahayuti Politics : पत्ता कट केल्यानंतर CM शिंदेंची भावना गवळींना मोठी गॅरंटी; म्हणाले, 'वाऱ्यावर सोडणार...'

भिवंडी लोकसभा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे राहिला आहे.मात्र सध्या भिवंडी लोकसभेत काँग्रेस पक्ष कमजोर असून या मतदारसंघात काँग्रेसकडे तगडा उमेदवारी देखील नव्हता. भिवंडी लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व नाही. हा मतदारसंघ मुस्लिमबहुल मतदारसंघ असल्याने केवळ मुस्लिम मतदारांच्या गणितावर काँग्रेस नेहमी भिवंडी लोकसभा मतदार संघावर आपला दावा करत आली आहे.

मात्र 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भिवंडीतून पराभव झाला. त्यामुळे यंदा भिवंडी लोकसभेवर राष्ट्रवादीने (शरद पवार) दावा करत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला. काँग्रेसकडून जिजाऊ सामाजिक संघटनेचे निलेश सांबरे हे इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने येथे आपले उमेदवार जाहीर केल्याने सांबरे हे आता अपक्ष म्हणून उभे राहणार का, याची चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)

भिवंडी लोकसभेतून भाजपचे कपिल पाटील हे 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळेस विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश टावरे यांचा एक लाख 56 हजार 329 मतांनी पराभव केला. कपिल पाटील यांना 5 लाख 23 हजार 583 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना 3 लाख 67 हजार 254 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी 51 हजार 455 मते घेतली.

(Edited By Roshan More)

 Suresh Mhatre
Maratha Reservation News: पंकजा मुंडेनंतर खासदार मुंडेंनाही ‘चले जाओ’; अंबाजोगाई तालुक्यात 18 जणांविरुद्ध गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com