शिवसेनेला मोठा धक्का : वसई तालुका प्रमुखासह अनेक जण एकनाथ शिंदेंच्या बरोबर

पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या संपर्कात असून त्यांनीही एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्याचे समजते.
Eknath Shinde, Nilesh Tendulkar
Eknath Shinde, Nilesh TendulkarSarkarnama
Published on
Updated on

विरार - शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या मागे राहणाऱ्या आणि विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्यामुळे तीन आमदारकीचे उमेदवार पडले. त्यांना त्यांची जागा दाखवू असे जाहीर वक्तव्य करणारा शिवसेनेचा तालुका प्रमुख नीलेश तेंडुलकर आणि काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वसईमध्ये एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या संपर्कात असून त्यांनीही एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्याचे समजते. ( Big blow to Shiv Sena: Vasai taluka head and many people with Eknath Shinde )

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या 40 आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी करून आपला वेगळा गट बनविल्यानंतर त्या विरोधात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. त्याचे लोन वसईमध्येही आले होते. वसई विरारमधील शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहणे पसंत केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला या ठिकाणी कोण ताकद देणार असे विचारण्यात येत होते. नाही म्हणता मच्छीमार नेते राजू तांडेल यांनी सर्वांत अगोदर आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असल्याचे बॅनर विरारमध्ये लावले होते. परंतु त्यानंतर इतर शिवसैनिकांनी मात्र शिंदे गटाकडे पाठ फिरवली होती.

Eknath Shinde, Nilesh Tendulkar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच जळगाव महापालिकेत धमाका?

या सगळ्या घडामोडीत बंडखोरांच्या विरोधात सामान्य शिवसैनिक उतरलेला असतानाच एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थ समजले जाणाऱ्या नीलेश तेंडुलकर यांनीही त्यावेळी शिंदेच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यावेळी त्यांनी भाषण करताना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार भाषण केले होते. त्यात त्यांनी विधानसभेवेळी वसई, नालासोपारा आणि भोईसर येथे चुकीचे उमेदवार देऊन हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबर हात मिळवणी केल्याने सेनेच्या तिन्ही जागा पडल्याचा आरोप केला होता. त्याच प्रमाणे बंडखोरांना इथे थारा देणार नसल्याचे जाहीर केले होते.

तेंडुलकर यांची जिल्हा प्रमुखपदी निवड होणार होती. परंतु नीलेश तेंडुलकर हे एकनाथ शिंदे समर्थ असल्याने मातोश्रीवरून त्यांच्या नावावर फुल्ली मारल्याचे समोर आल्याने अखेर तेंडुलकर यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. नीलेश तेंडुलकर यांच्या बरोबर पालघर उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, सुदेश चौधरी आणि दिवाकर सिंग यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सेनेच्या या पदाधिकाऱ्या बरोबरच पालिकेतील 5 नगरसेवक ही शिंदे गटात सामील झाल्याचे बोलले जात होते. परंतु यापैकी अजूनपर्यंत तरी एकही जण शिंदे गटात गेले नसल्याचे समोर आले आहे. तर खासदार राजेंद्र गावित मात्र शिंदेच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे.

Eknath Shinde, Nilesh Tendulkar
आठवा आमदार न मिळाल्याने गोवा काँग्रेसमधील 'एकनाथ शिंदे' यांचे बंड थंडावले...

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्यामध्ये उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे हे मूळचे काँग्रेचमधून आले होते. त्याच प्रमाणे सुदेश चौधरी हे बविआमधून आले होते तर दिवाकर सिंग ही दुसऱ्या पक्षातून आले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने सामान्य शिवसैनिकांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सेनेतून सांगण्यात येत आहे. परंतु नीलेश तेंडुलकर यांनी मात्र शिवसेनेला मोठा धक्का दिला असल्याची चर्चा आहे. तेंडुलकर यांच्या मुले सेना तर वाढली नाहीच पण सेनेचे खच्चीकरण मात्र त्यांनी केले. त्यामुळे पक्षात तालुकाप्रमुख पदाची जागा अडवून बसलेला गेल्याची प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिक देत आहे.

Eknath Shinde, Nilesh Tendulkar
वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांचा एकला चलो'चा नारा

शिवसेनेच्या झाडावर आलेली बांडगुळे निघून गेल्याने आता हे झाड पुन्हा एकदा बहरेल. सच्चा शिवसैनिक पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील शिवसेना फुलवेल. आम्ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहोत आणि राहणार. आमचा एकही नगरसेवक फुटलेला नाही. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम बंडखोर करत आहेत. परंतु त्यांचे हे पर्यंत यशस्वी होणार नाहीत.

- शिरीष चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना

मी आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असून पुढेही त्यांच्या बरोबरच राहणार आहोत. माझ्या बाबतीत चुकीची माहिती देणाऱ्यांचा मी निषेध करते. शिवसेना या चार अक्षरामुळे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे.

- किरण चेंदवणकर, माजी नगरसेविका, शिवसेना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com