Manisha Kaynade Join Shinde group: मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार

Maharashtra Politics महाशिबिराच्या दिवशी संबंधित आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Manisha Kaynade Join Shinde group:
Manisha Kaynade Join Shinde group: Sarkarnama
Published on
Updated on

Manisha Kaynade Join Shinde group: राज्याच्या राजकारणातून पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील एक आमदार मनिषा कायंदे (Manisha Kaynade will Join Shinde group) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही तासांपासून त्या नॉटरिचेबल होत्या. महाशिबिराच्या दिवशी संबंधित आमदार कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Manisha Kaynade Join Shinde group:
Keshav Upadhye News : दंगलींच्या माध्यमातून सत्ता गेलेल्यांची तडफड; उपाध्येंची विरोधकांवर टीका!

कोण आहेत मनिषा कायंदे ?

लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे (Manisha kayande) यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे. भाजपमधून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. लहानपणी त्या वडिलांसोबत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जात असत. त्यांचे वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरावायचे आणि त्या वडिलांना मदत करत असत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र त्यांनी अगदी जवळून पाहिला आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील तीनदा कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते. 1992मध्ये मनिषा कायंदे यादेखील वडिलांसोबत अयोध्येला कारसेवासाठी गेल्या होत्या.

अयोध्येला जाऊन आल्यानंतर त्यांनी भाजपमधून (BJP) आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. 2012मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेकडून त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानपरिषेचे तिकीट दिले.  विधान परिषदेवर जाणं हा आपल्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉइंट होता, असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. (Shinde Group)

महिलांसंबधीच्या प्रश्नांवर मनिषा कायंदे कायम आवाज उठवताना दिसत असतात. महिलांना न्याय मिळावा यासाठी त्या अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत. सर्वच क्षेत्रात महिला अग्रस्थानी असाव्यात, राज्याच्या मुख्यसचिवपदी महिला असावी, मुंबई पोलीस आयुक्तपदीही महिला असावी, अशी त्यांची आग्रहाची मागणी असते. इतकेच नव्हे तर महापालिकेत महिलांना आरक्षण असेल तर विधानसभा आणि लोकसभेही महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे अशीही त्यांची इच्छा आहे. तसेच राजकीय पक्षांनीच महिलांना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असंही त्या म्हणतात.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com