Keshav Upadhye News : दंगलींच्या माध्यमातून सत्ता गेलेल्यांची तडफड; उपाध्येंची विरोधकांवर टीका!

Keshav Upadhye Criticize to Opposition : देशात पुन्हा मोदी सरकार येणार, प्रवक्त्याने केला दावा..
Keshav Upadhye News :
Keshav Upadhye News :Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : विशिष्ट समाजातील व्यक्तिंकडून गैरप्रकार केले जात असतील तर त्याविरोधात हिंदू समाजाने जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठविणे गैर नाही, असे भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

"राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सत्ताकाळात कुणीही असुरक्षित नाही. काही ठिकाणी दंगलींच्या माध्यमातून सत्ता गेलेल्यांची तडफड दिसत आहे, आजपर्यंत दंगलींच्या नावावर राजकीय पोळ्या कुणी भाजल्या याचा इतिहास जयंत पाटील यांनी तपासावा, असा सल्ला प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला. भाजप सरकारच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे," त्यानिमित्ताने वसंतस्मृती कार्यालयात माध्यमांशी ते बोलत होते.

Keshav Upadhye News :
Aditya Thackeray On Eknath Shinde : 'शिंदे गटाने 'जागतिक गद्दार दिन' साजरा करावा' ; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं!

राज्यात काही ठिकाणच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना उपाध्ये म्हणाले, "जयंत पाटील यांनी दंगलींचा इतिहास तपासावा. हिंदू जनजागरण मोर्चाचे समर्थन करताना विशिष्ट समाजातील व्यक्तिंकडून गैरप्रकार केले जात असतील तर मोर्चे निघतीलचं, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Keshav Upadhye News :
Uddhav Thackeray Shiv Sena Chief : उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख होणार; हजारो शिवसैनिकांसमोर होणार फेरनिवड!

शेतकऱ्यांना अधिक दर देवून न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कांदा खरेदीसाठी नाशिकमध्ये एनसीसीएचे केंद्र उभारले आहे. केंद्र सरकारची मागील नऊ वर्षांची कारकीर्द स्वातंत्र्यानंतर तेजस्वी ठरली आहे. शासन व्यवस्थेला ‘सुशासन व्यवस्थे’त बदलण्यात आले आहे. सरकारने आठशेहून अधिक योजना अमलात आणून त्यांना नवा आकार दिला, असेही ते म्हणाले.

यावेळी सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन, शहराध्यक्ष गिरीष पालवे, आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, गोविंद बोरसे, जगन पाटील, अविनाश पाटील, सुजाता करजगीकर, ज्योती चव्हाणके आदी उपस्थित होते.

Keshav Upadhye News :
Keshav Upadhye : ''आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे मुंबईकरांवर 10 हजार कोटींचा बोजा!''

देशात पुन्हा मोदी...

विरोधकांकडून परिवर्तनाचा दावा पोकळ आहे. यापुर्वी सन २०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवर्तनाचा नारा दिला होता, मात्र केंद्रात पुन्हा भाजपचीच सत्ता आली. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल. राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाप्रती कुठलीच नाराजी नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचे काम उत्तम आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेले जात आहे, असेही केशव उपाध्ये म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com