Thackeray- Shinde Politics: मोठी बातमी! शिवसेना भवन ताब्यात द्या; न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल

Shivsena Bhavan News| निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आधीच शिंदे गटाला दिले आहे.
Thackeray- Shinde Politics: मोठी बातमी! शिवसेना भवन ताब्यात द्या; न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल

Thackeray- Shinde Politics : शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गटाने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसैनिकांचे मंदिर अशी ओळख असलेल्या शिवसेना भवनाचा आणि शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाकडे द्या, अशी मागणी वकील आशिष गिरी यांनी केली आहे. याबाबत गिरी यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, या याचिकेवर २४ एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणीही गिरी यांच्या वतीने करण्यात आली आहे. (Big news! Hand over Shiv Sena Bhavan, demand of Shinde group)

गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना (Shivsena) भवनासह, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्या, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मी वकील असण्यासोबत एक मतदार सुद्धा आहे. म्हणुन मी ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. ही याचिका मी माझ्या बाजून दाखल केली आहे. मी कोणाच्याही बाजूने ही याचिका दाखल केलेली नाही. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तर ते त्यांच्याकडेच राहिल पण जर निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ते एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले तर ते त्यांच्याकडे जाईल.

Thackeray- Shinde Politics: मोठी बातमी! शिवसेना भवन ताब्यात द्या; न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल
k.Chandrashekhar Rao News : छत्रपती संभाजीनगरच्या सभेत बीआरएसमध्ये मोठे प्रवेश होणार ?

उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करता आली असती, पण उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाबाबत आधीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मीही थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं स्पष्टीकरणही गिरी यांनी दिलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या याचिकेवर 24 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिकेवरही सुनावणी व्हावी अशी मागणी आशिष गिरी यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे २४ तारखेला या याचिकेवर सुनावणी होते का, न्यायालय त्यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com