k.Chandrashekhar Rao News : छत्रपती संभाजीनगरच्या सभेत बीआरएसमध्ये मोठे प्रवेश होणार ?

Harshvardhan Jadahv : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून जाधव हे अडगळीत पडल्याचे चित्र.
K. Chandrasekhar Rao Rally In  News
K. Chandrasekhar Rao Rally In NewsSarkarnama

Marathwada : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k.Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर `किसानवाद`, चा नारा देत त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार देशभर करण्यासाठी महाराष्ट्राची निवड केली. तेलंगणाला लागून असलेल्या नांदेड जिल्ह्यातून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. नांदेडमध्ये दोन जाहीर सभा घेत त्यांनी राष्ट्रवादी, स्वाभीमानी, शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या माजी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतले.

K. Chandrasekhar Rao Rally In  News
Beed Market Committee News : जयदत्त क्षीरसागरांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकच पॅनल देणार..

अजूनही मोठा मासा बीआरएसच्या गळाला लागला नसला तरी या पक्षाची चर्चा मात्र राज्यात विशेषत: मराठवाड्यात सुरू झाली आहे. विदर्भासह (Farmers) मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते बीआरएसशी जोडले जात आहेत. हैदराबाद येथील केसीआर यांच्या निवासस्थानी गेल्या काही दिवसांत माजी आमदार हर्षवर्धन जाधव, (Harshvardhan Jadhav) राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला.

तेव्हाच हर्षवर्धन जाधव यांनी केसीआर यांना छत्रपती संभाजीनगरात सभा घेण्याची गळ घातली होती. आता प्रत्यक्षात २४ एप्रिल रोजी ही सभा घेण्यास केसीआर यांचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे या सभेत जिल्ह्यातील काही शेतकरी संघटनांचे पदाधिकारी नव्याने बीआरएसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचा विचार केला तर त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. ही चळवळ नेतृत्वाअभावी क्षीण झाल्याचे चित्र आहे.

त्यामुळे या संघटनांमधील बरेचसे पदाधिकारी, कार्यकर्ते हे बीआरएसचा पर्याय स्वीकारू शकतात. प्रामुख्याने बीआरएसची छत्रपती संभाजीनगरात होणारी सभा ही माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठीची असणार आहे. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून जाधव हे अडगळीत पडल्याचे चित्र आहे.

बीआरएसमध्ये प्रवेश करण्यापुर्वी त्यांनी शिवसेना (ठाकरे) गटासोबत जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्यासाठी शिवसेनेने दरवाजे बंद केले आहेत. इतर कुठलाही पक्ष जाधव यांना स्वीकारण्याची जोखीम घेण्यास तयार नव्हता. अशावेळी जाधव यांना नव्या पर्यायाची गरज होती, ती बीआरएस प्रवेशाने पुर्ण झाली आहे. बीआरएसला देखील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसारख्या पक्षाला पराभूत करण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या जाधव यांच्या सारखा तरुण, तडफदार नेता हाती लागल्याने विस्ताराला वाव मिळणार आहे.

K. Chandrasekhar Rao Rally In  News
Thackeray- Shinde Politics: मोठी बातमी! शिवसेना भवन ताब्यात द्या, शिंदे गटाची मागणी

जाधव यांचे कन्नड-सोयगाव तालुक्यात प्राबल्य आहे. त्यामुळे या तालुक्यात बीआरएसच्या कामाला तातडीने सुरूवात होवू शकते. जाधव यांनी तशी सुरूवात केली असली तरी ते किती दिवस आपल्या निर्णयावर ठाम राहतील याबद्दल शंका उपस्थितीत केली जाते. दुसरीकडे राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेले कदीर मौलाना, अभय पाटील चिकटगांवकर याचा पक्षाला कितपत फायदा होईल हे सध्या सांगता येणार नाही.

अल्पसंख्याक चेहरा म्हणून मौलाना यांना पक्षात घेण्यात आले आले, तर चिकटगांवकर हे तरूण, विधानसभा लढवलेले उमेदवार म्हणून त्यांचा विचार केला गेला असावा. या तीन प्रवेशांमुळे बीआरएसची जिल्ह्यात आणि मराठवाड्यात चर्चा सुरू झाली आहे. अनेक शेतकरी संघटना, त्यांचे पदाधिकारी पर्याय म्हणून बीआरएसचा विचार करत आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत या पक्षाचा निभाव प्रस्थापित प्रादेशिक पक्षांसमोर लागणे सध्या तरी अवघड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com